रस्त्याच्या कारणावरून चुलत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:54+5:302021-07-18T04:16:54+5:30

घेरडी येथील कुंडलिक भाऊ सुरवसे हे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घरासमोर असताना मुलगा महेश याने पुतण्या रावसाहेब विष्णू ...

Beating cousin for road reasons | रस्त्याच्या कारणावरून चुलत्याला मारहाण

रस्त्याच्या कारणावरून चुलत्याला मारहाण

घेरडी येथील कुंडलिक भाऊ सुरवसे हे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घरासमोर असताना मुलगा महेश याने पुतण्या रावसाहेब विष्णू सुरवसे यास तू आमच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर घराच्या पाठ भिंतीला तिरकी लाकडे का लावली आहेस, ती तुम्ही काढा, असे म्हणाले असता पुतण्या रावसाहेब सुरवसे तेथून निघून गेला. दुपारी ३ च्या सुमारास कुंडलिक सुरवसे हे घरासमोर असताना पुतण्या रावसाहेब याने दारू पिऊन तुम्हाला काय करायचे ते करा, ही वाट माझ्या रानात असल्याने मी लाकडे काढणार नाही, असे सांगितले.

त्यावेळी त्याचा मुलगा अमोल याने तेथे येऊन शिवीगाळ करू लागला. मी त्यांना शिव्या देऊ नका, असे म्हणत असताना रावसाहेब याने केबल वायरने माझ्या पिंडरीवर व पाठीवर मारहाण केली. तर त्याचा मुलगा अमोल यानेही हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या वेळी सून सीमा ही भांडणे सोडण्यासाठी आली असता त्यांनी तुला जिवे मारतो, असे म्हणून निघून गेला. याबाबत कुंडलिक सुरवसे याने फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beating cousin for road reasons