भावासह पुतण्याची चुलत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:54+5:302021-04-24T04:21:54+5:30

हलदहिवडी येथील दिलीप बाबूराव कुंभार यांच्याकडे भाऊ पंडित बाबूराव कुंभार व त्याचा मुलगा पृथ्वीराज पंडित कुंभार यांनी तुला दिलेले ...

Beating cousin with brother | भावासह पुतण्याची चुलत्यास मारहाण

भावासह पुतण्याची चुलत्यास मारहाण

हलदहिवडी येथील दिलीप बाबूराव कुंभार यांच्याकडे भाऊ पंडित बाबूराव कुंभार व त्याचा मुलगा पृथ्वीराज पंडित कुंभार यांनी तुला दिलेले पैसे दे, अशी मागणी केली. यावेळी दिलीप कुंभार याने तुमचे पैसे दिले आहेत, माझ्याकडे तुमचे पैसे नाहीत असे म्हणाले. त्यावेळी पुतण्या पृथ्वीराज याने गच्ची धरून तुला लय मस्ती आली आहे का? तू आमचे पैसे कसे देत नाहीस, तेच बघतो असे म्हणून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी दमदाटी करत काठीने दिलीपच्या गुडघ्यावर व नडगीवर मारून जखमी केले, तर पुतण्या पृथ्वीराज यानेही दगडाने मारहाण करून जखमी केले. सदरची भांडणे सोडविण्यासाठी दिलीपची पत्नी सुजातामध्ये आली असता तिलाही शिवीगाळ करून ढकलून दिले. याप्रकरणी दिलीप कुंभार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी पंडित कुंभार व पृथ्वीराज कुंभार (रा. हलदहिवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beating cousin with brother