ऊसतोड महिलेला मारहाण; मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:56+5:302020-12-27T04:16:56+5:30

जिंतूर, जि.परभणी येथील विजय राठोड व नंदा राठोड हे पती-पत्नी मागील दोन महिन्यांपासून जत येथील साखर कारखान्याकडे ऊसतोडणीच्या कामावर ...

Beating a cane woman; Filed a lawsuit against the lawsuit | ऊसतोड महिलेला मारहाण; मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

ऊसतोड महिलेला मारहाण; मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

जिंतूर, जि.परभणी येथील विजय राठोड व नंदा राठोड हे पती-पत्नी मागील दोन महिन्यांपासून जत येथील साखर कारखान्याकडे ऊसतोडणीच्या कामावर आहेत. १० डिसेंबर रोजी मुकादमासह पती-पत्नी महुद (ता. सांगोला) येथील शेतामध्ये तोडलेला ऊस ट्रॅक्टरमध्ये भरत असताना शेतकऱ्याने ऊसतोड कामगारांना चहा आणून दिला. यावेळी इतर मजुरांनी चहा पिलेल्या उष्ट्या कपात नंदा राठोड यांना चहा दिल्याने त्यांनी चहा न पिता तो फेकून दिला. यावरून मुकादम बंडू राठोड याने नंदा राठोड यांच्या डोळ्यावर मोबाईल चार्जिंग बॅटरी फेकून मारली होती. यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर दवाखान्यात उपचार केले. दरम्यान, नंदा राठोड यांनी सांगोला पोलिसात तक्रार दिल्यावर मुकादम पुन्हा मारहाण करेल, या भीतीने मूळगावी येनोलीतांडा (ता. जिंतूर, जि. परभवणी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने सांगोला पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे.

Web Title: Beating a cane woman; Filed a lawsuit against the lawsuit