तोंडाकडे पाहिल्याने केळी व्यापाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:54+5:302021-07-11T04:16:54+5:30

करमाळा : तोंडाकडे पाहिल्याच्या कारणावरून एका केळी व्यापाऱ्याला शुक्रवारी रात्री करमाळा शहरातील फंड गल्लीत मारहाण झाली. केळी व्यापारी सोहेल ...

Beating a banana trader by looking him in the face | तोंडाकडे पाहिल्याने केळी व्यापाऱ्याला मारहाण

तोंडाकडे पाहिल्याने केळी व्यापाऱ्याला मारहाण

करमाळा : तोंडाकडे पाहिल्याच्या कारणावरून एका केळी व्यापाऱ्याला शुक्रवारी रात्री करमाळा शहरातील फंड गल्लीत मारहाण झाली.

केळी व्यापारी सोहेल इस्माईल तांबोळी (वय २२, रा. फंडगल्ली, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप रामदास पवार व सागर रामदास पवार या दोन भावांविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केळी व्यापारी तांबाेळी यांच्या घरासमोर आरोपी संदीप पवार हा राहावयास आहे. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होतात. काही दिवसांपूर्वी एकमेकाकडे पाहण्याच्या कारणावरून किरकोळ तक्रार झाली होती. नगरसेवक अतुल फंड यांनी ही तक्रार आपसात मिटवली होती. शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सोहेल आणि त्यांचे भाऊ साजिद हे गल्लीतील केळीच्या गोडाऊनसमोर बसले असताना संदीप पवार व सागर पवार हे दोघेजण आले. तोंडाकडे पाहिल्याच्या कारणावरून त्या दाेघांनी तांबोळी बंधूंना शिवीगाळ कली. शिवीगाळ करू नका म्हणताच सागर याने डोळ्याच्या भुवईवर मारूण जखमी केले. भाऊ साजिद हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली.

Web Title: Beating a banana trader by looking him in the face