कुत्र्याला भाकरी टाकण्यावरून मुलीसह माता-पित्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST2021-04-15T04:21:14+5:302021-04-15T04:21:14+5:30

वैराग : कुत्र्याला भाकरी टाकण्याच्या कारणावरून एका मुलीला मारहाण केल्याची घटना हळदुगे (ता. बार्शी) येथे मंगळवारी दुपारी तीन ...

Beaten parents with daughter for throwing bread to dog | कुत्र्याला भाकरी टाकण्यावरून मुलीसह माता-पित्याला मारहाण

कुत्र्याला भाकरी टाकण्यावरून मुलीसह माता-पित्याला मारहाण

वैराग : कुत्र्याला भाकरी टाकण्याच्या कारणावरून एका मुलीला मारहाण केल्याची घटना हळदुगे (ता. बार्शी) येथे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुलीची आई सिंधू नलवडे यांनी वैराग पोलिसांत सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मंगळवार दुपारी बाराच्या दरम्यान घरातील काम आटोपून सिंधू नलवडे या पतीसह शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. काही वेळातच पाळीव कुत्र्याला भाकरी टाकण्याच्या कारणावरून मुलीला मारहाण होत असल्याचा तिच्या पालकांना फोन आला. शेत जवळ असल्याने तिच्या पालकांनी घराकडे धाव धेतली. तिच्या आई-वडिलांनी शेजारी राहणाऱ्या मनीषा गुणवंत नलवडे व ऐश्वर्या यांना जाब विचारला असता त्यांनी पुन्हा मुलीसह आई-वडील यांना काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.

दरम्यान, गुणवंत मारुती नलवडे, दादा शिंदे, पिंकू दादा शिंदे व लोचना मारुती नलवडे यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली.

Web Title: Beaten parents with daughter for throwing bread to dog