उसन्या पैशावरून जेऊर येथे मारहाण, परस्पराच्या विरोधात गुन्हा दाखल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST2021-07-31T04:23:16+5:302021-07-31T04:23:16+5:30
शंकर विष्णू माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, भावकीतील उमेश माने व इतर लोक घराजवळ राहतात. उमेश माने व ...

उसन्या पैशावरून जेऊर येथे मारहाण, परस्पराच्या विरोधात गुन्हा दाखल.
शंकर विष्णू माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, भावकीतील उमेश माने व इतर लोक घराजवळ राहतात. उमेश माने व इतर भावकीतील लोकांचा एकमेकांशी पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार होत असे. रविवारी (२५) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्याचा भाचा विठ्ठल जाधव याच्यासोबत बाजारतळ येथे थांबले होते. तेव्हा उमेश माने, विकास माने, राहुल माने, दत्ता माने, आकाश माने व बिभिषण माने (सर्व रा. जेऊर) हे बाजारतळ येथे आले. उमेश माने, विकास माने यांनी फिर्यादीला ‘उसने दिलेले पैसे दे, नाही तर तुला तलवारीने तोडून टाकीन’ अशी धमकी दिली. फिर्यादी त्यांना समजावून सांगताना त्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी भाचा विठ्ठल जाधव हा सोडविण्यासाठी आला असता, सर्वांनी बेदम मारहाण केली. वडील विष्णू माने, चुलत भाऊ हणुमंत माने यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली.
याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे नोंदवून एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे नोंदले आहेत.