सासरच्या मंडळींकडून जावयाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:18+5:302021-06-09T04:28:18+5:30

जावयाने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या तिघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मधुकर मदने (रा. कात्रज) यांनी फिर्याद ...

Beaten to death by father-in-law's congregations | सासरच्या मंडळींकडून जावयाला बेदम मारहाण

सासरच्या मंडळींकडून जावयाला बेदम मारहाण

जावयाने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या तिघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मधुकर मदने (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे, यात यांनी म्हटले आहे, की पत्नी शुभांगी हिच्याबरोबर तंबाखू खाण्याच्या कारणावरून ४ जूनला वाद झाला होता. हा प्रकार तिने माहेरी सांगितल्यावर ५ जूनला रोजी तू आमच्या बहिणीला का त्रास देतो, असे म्हणून लोखंडी पाइपने मारून जखमी केले.

आई सुमन मदने ही मला सोडविण्यास आली असता, तिलाही या तिघांनी मारहाण करण्यात आली. तसेच नितीन शिंदे यानेही लोखंडी पाइपने पाठीत मारून जखमी केले. शिवाय मोटारसायकल फोडून नुकसान केले असे. किरणने दिलेल्या तक्रारीवरून कुंडलिक निवृत्ती शिंदे, नितीन बाळासाहेब शिंदे व साधना कुंडलिक शिंदे (सर्व रा. तांदळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार रणदिवे तपास करत आहेत.

----

Web Title: Beaten to death by father-in-law's congregations