मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:48+5:302021-05-06T04:23:48+5:30

मधुकर दत्तात्रय पवार व संभाजी दत्तात्रय पवार या भावात शेतजमिन वाटपावरून भांडण-तंटा झाला होता. दरम्यान भाऊ संभाजी व त्याची ...

Beat the number brother with the help of children | मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाला मारहाण

मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाला मारहाण

मधुकर दत्तात्रय पवार व संभाजी दत्तात्रय पवार या भावात शेतजमिन वाटपावरून भांडण-तंटा झाला होता. दरम्यान भाऊ संभाजी व त्याची मुले नेहमी काही ना काही कारण काढून भांडण करून मधुकरवर दबाव आणीत होते. मंगळवारी मधुकर पवार शेतातून वैरण घेऊन येत असताना निरगुडीच्या झाडाला घासली. यावेळी भाऊ संभाजीने मधुकरला तू येथून जायचे नाही तू तुझ्या रानातून जा, असे म्हणून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून त्याची मुले दिलीप पवार व ज्ञानेश्वर पवार यांना बोलावून घेऊन ते सर्वजण मधुकरला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी संभाजीने मधुकर यास कवळ्यात धरून दोन-तीन वेळा खाली कुचल्यामुळे पायाला वेदना होऊ लागल्या. म्हणून त्याने जोरात ओरडल्याचा आवाज ऐकून पत्नी पमाबाई व मुलगा सुहास यांनी त्या ठिकाणी येऊन भांडण सोडवासोडव केली. याबाबत मधुकर दत्तात्रय पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संभाजी दत्तात्रय पवार, दिलीप संभाजी पवार व ज्ञानेश्वर संभाजी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beat the number brother with the help of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.