शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या दरासोबत सोलापूरच्या बाजारात आवकही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:30 IST

दूध व शेतीमालाला बाजारात दर नसल्याने राज्यातील शेतकरी १० दिवसांच्या संपावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात संप सुरू असला तरी त्याचा म्हणावा तेवढा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेवर झालेला दिसत नाही

ठळक मुद्दे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक काहीअंशी कमीमागील आठवड्यात कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत गेली शेतकºयांकडे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणावर 

सोलापूर: राज्यात शेतकºयांचा संप सुरू असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासह अन्य भाजीपाला व पालेभाज्यांची आवक पूर्वीप्रमाणेच आहे. उलट कांद्याचे दर वाढल्याने शेतकºयांनी आपला कांदा बाजारात आणल्यामुळ्य सोमवारी  कांद्याची आवकही वाढल्याचे दिसून आले.

दूध व शेतीमालाला बाजारात दर नसल्याने राज्यातील शेतकरी १० दिवसांच्या संपावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात संप सुरू असला तरी त्याचा म्हणावा तेवढा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेवर झालेला दिसत नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला, पालेभाज्या व फळभाज्यांची आवक काहीअंशी कमी झाली असली तरी हा परिणाम दरवर्षीप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले. कांद्याचे दर प्रतिक्विंटल ५०० रुपयांवर आले होते. बाजारात कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकºयांनी कांदा शेतातच गाढून टाकला. काहींनी मात्र आज ना उद्या कांद्याला चार पैसे वाढून येईल या अपेक्षेने जपून ठेवला आहे. मोठ्या कष्टाने कांद्याची जपणूक करुनही म्हणावा तितका भाव आजही कांद्याला नाही; मात्र काहीअंशी कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. दरात घसरण झाल्यानंतर दररोज सरासरी १०० ट्रकच्या जवळपास कांद्याची आवक होत होती. सोमवार दिनांक ४ जून रोजी १६२ ट्रक कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली होती. मागील आठवड्यात कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत गेली व  शुक्रवारी-शनिवारी कांद्याचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपयांवर गेला होता. सोमवारी  दरात १०० रुपयांची घसरण होऊन एक नंबरचा कांदा १३०० प्रति क्विंटलने गेला. ५०० ते १३०० रुपयांचा दर कांद्याला मिळाल्याने बाजार समितीतून सांगण्यात आले. कांद्याप्रमाणेच पालेभाज्या, फळभाज्या व भुसारची आवक नेहमीप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले.  आवकमध्ये कमी-अधिक काही प्रमाणात बदल दिसत असला तरी तो मे-जून महिन्यात दरवर्षी असतो असे सांगण्यात आले. 

दर वाढल्याने कांदा बाजारात

  • - ४०० ते ९०० रुपयांवर खाली गेलेला दर मागील  आठवड्यात प्रतिक्विंटल ९०० ते १४०० पर्यंत आला. 
  • - पावसाळा सुरू झाल्याने व दरात वाढ झाल्याने जपणूक केलेला कांदा शेतकºयांनी बाजारात आणण्यास सुरुवात केली.
  • - सोलापूर बाजार समितीमध्ये वर्षभरापासून सुरू असलेली कांद्याची आवक आजही सुरूच 
  • - सोलापूर जिल्ह्यात शेतकºयांकडे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणावर 
टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarket Yardमार्केट यार्डonionकांदा