बार्शीत वृक्ष बँक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:57+5:302021-07-14T04:25:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने बार्शी येथे वृक्ष बँकेचे वृक्ष मित्र मधुकर डोईफोडे यांच्या ...

Barshit tree bank started | बार्शीत वृक्ष बँक सुरू

बार्शीत वृक्ष बँक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

बार्शी : लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने बार्शी येथे वृक्ष बँकेचे वृक्ष मित्र मधुकर डोईफोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. विकास जाधव होते.

याप्रसंगी चेअरमन नंदकुमार कल्याणी, सचिव संतोष जोशी, संदीप नागणे, बापूसाहेब कदम, प्रशांत पंडित, गोवर्धनदास जाजू, गिरीश शेटे, महेंद्र कथले, अक्षय बंडेवार, अल्ताफ शेख, राहुल साखरे उपस्थित होते.

एक जुलैपासून बार्शी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये वृक्षारोपणाची मोहीम धूमधडाक्यात सुरू करून अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत सर्व गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आपल्याकडे शिल्लक असलेली झाडे या वृक्ष बँकेत आणून जमा करावीत, असे आवाहन अध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी केले आहे.

---

Web Title: Barshit tree bank started