बार्शीत दिवसाढवळ्या घर फोडले; ७५ हजारांचा ऐवज चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST2021-02-20T05:02:21+5:302021-02-20T05:02:21+5:30
या बाबत वाहक सुदर्शन मांजरे (२८ रा. धर्माधिकारी प्लॉट, बार्शी) यांनी शहर पोलिसात तक्रार देताच पोलिसानी अज्ञात आरोपी ...

बार्शीत दिवसाढवळ्या घर फोडले; ७५ हजारांचा ऐवज चोरीला
या बाबत वाहक सुदर्शन मांजरे (२८ रा. धर्माधिकारी प्लॉट, बार्शी) यांनी शहर पोलिसात तक्रार देताच पोलिसानी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यात आरोपीनी कपाटातील ६७ हजार ५०० रुपयांचे १५ ग्रॅम सोन्याचे गंठण, ५ हजाराचे चांदीचे फुलपात्र ग्लास व पैंजण आणि रोख अडीच हजार रुपये अशी ७५ हजाराचा ऐवज चोरुन नेला.
घराचे मालक सुदर्शन मांजरे घराला कुलुप लावून आई वडिलांसह देगाव येथे शेतातील कामासाठी घराला कुलुप लावून गेलेले होते. दिवसभर काम सपल्यानंतर सायंकाळी परत आले असता गेटचे कुलुप उघडून घराचे दार उघडत असताना ते उघडले नाही. त्यामुळे त्यांनी पाठमागे जाऊन पहाताच तो उघडा दिसला. घरात जाऊन पहाणी करताना लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाची तपासणी करताच वरील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसले. त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून, पुढील तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करत आहेत.
----