बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

By Admin | Updated: January 31, 2017 17:27 IST2017-01-31T17:27:10+5:302017-01-31T17:27:10+5:30

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

In Barshi, the strategy came in the wake of the crystal clearance | बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग
शहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमत
बार्शी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्याच हातात पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सूत्रे यावीत यासाठी गुप्त खलबताद्वारे रणनिती आखत उमेदवाऱ्या नेमक्या कोणत्या गावात, कोणाला द्यायची हे गणीत मांडत असताना राष्ट्रवादीचे आ़ दिलीप सोपल व शिवसेनेचे राजेंद्र राऊत ही नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनसंपर्काबरोबरच अर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत़ त्यामुळे यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असे दिसत आहे़
बार्शी तालुक्यात जि़प़च्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत़ या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही झाली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला किती जागा सोडणार हे अद्यापी दोन्ही काँग्रेसने जाहीर केलेले नाही, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी जागा सोडणार की काँग्रेसच्याच उमेदवाराला त्यांच्या हातात घड्याळ बांधायला लावणार हे देखील अद्यापी गुलदस्त्यातच आहे़ गेल्या पंधरा दिवसापासून आ़ दिलीप सोपल यांनी ही निवडणुक अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांच्या हाचालीवरुन दिसून येत आहे़
इकडे शिवसेनेमध्ये देखील वातावरण कांहीसे गंभीर झाल्याचे जाणवत आहे, शिवसेनेचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जिल्ह्यातील आघाडीसंदर्भात चर्चा सुरु ठेवल्याने तसेच सहकार मंत्र्यांनी देखील जिल्ह्यातील निवडणुक ही आघाडी करुन कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याने कोणत्या चिन्हावर निवडणुक लढवायची आहे, याबाबत विचारमंथन सुरु असल्याचे सांगीतलेले आहे, त्यामुळे जिल्ह्याबरोबरच तालुक्यात नेमके कोणाला कोणते निवडणुक चिन्ह मिळणार याची देखील मोठी उत्सुकता लागली आहे़
माजी आ़ राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्यात भाजपाबरोबरच युती करण्याच्या मुडमध्ये आहेत, मात्र त्यांच्या या भूमिकेबाबत अद्यापी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी होय नाही असे कांहीही सांगीतलेले नाही, त्यामुळे राऊत यांच्या या युतीच्या धोरणाला शिवसेना संमती देणार की नाही, आणि जर शिवसेनेने संमती दिली नाही तर राऊत पुढे कोणते धोरण अवलंबणार याबाबत तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत हे काय निर्णय घेणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे़
--------------------------
आयाराम-गयाराम
कोणतीही निवडणुक म्हटले की आयाराम -गयाराम ची चलतीच असते, यंदाही निवडणुकीच्या तोंडावर नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेतून राष्ट्रवादीतून कांही जण राष्ट्रवादीतून शिवसेनेतून प्रवेश करु लागले आहेत़
------------------------
पैसा आणि निवडणूक
निवडणूक अन् पैसा हे समीकरण तयार झाले असून निवडणूक आयोगाने कितीही काटेकोर नियम लावले तरी राजकीय पक्ष व उमेदवार कोट्यवधी रुपये निवडणुकीवर खर्च करीत असतात, त्यामुळे गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे दोन्ही राजकीय पक्ष हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा ज्याठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी अधिकारी किंवा उद्योजक असलेल्याच्या पत्नी किंवा आईला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे नोटा बंदी असली तरी पैशाचा मात्र भरपूर चुराडा निवडणुकीत होणार हे खरे आहे़

Web Title: In Barshi, the strategy came in the wake of the crystal clearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.