शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

आॅर्केस्ट्राच्या नावाखाली सोलापुरात बारबालांची छमछम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:00 IST

हे तर खुलेआम डान्स बारच: रात्री साडेबारापर्यंत परवानगी; पण सारेच थिरकतात पहाटेपर्यंत.. 

ठळक मुद्देकर्नाटक राज्यातून येणाºया ग्राहकांची संख्या मोठी...कायद्याच्या नाकावर टिच्चून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू झालाय या बारबालांचा उन्माद

सोलापूर : संध्याकाळी दिवेलागणीनंतर सोलापूरच्या आॅर्केस्ट्रा बारमध्ये गाऊ लागतात गायिका... जशी जशी रात्र फुलत जाते, तसं हातातला माईक होतो बाजूला अन् पडद्यामागून आलेल्या बारबालांच्या पायातल्या घुंगरांचा सुरू होतो छमछमाट... होय. महाराष्टÑात डान्स बारला बंदी असतानाही कायद्याच्या नाकावर टिच्चून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू झालाय या बारबालांचा उन्माद. उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी युवक उपाध्यक्ष सागर पवार  यांनी डान्सबारमधील मारहाणीच्या मनस्तापावर विष प्राशन केले. सोमवारी त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालवले जात असलेले डान्स बार तरुणाईसाठी किती घातक ठरत आहेत, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ टीमने जिल्ह्यातील डान्स बारचा घेतलेला शोध.

आॅर्केस्ट्रा म्हटलं की, कलेचा जागर असतो, मात्र या ठिकाणी आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू झाले आहेत. आॅर्केस्ट्रा बारमध्ये कलाकार हे स्टेजवर बसलेले असतात. यामध्ये ७ महिलांना परवानगी असून त्या गायिका असाव्यात, असा नियम आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी विविध हिंदी किंवा मराठी गीतांचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे. असे असताना हॉटेलमध्ये स्टेजवर ७ ते १४ मुली बसलेल्या असतात.

काही गायिका असतात तर काही नर्तिका (डान्सर) असतात. सुरुवातीला बारची सुरुवात ही गाण्याने होते. काही कालावधी गेल्यानंतर विशिष्ट पोशाखात मुली नृत्याला सुरुवात करतात. बारमध्ये आलेले ग्राहक या डान्स करणाºया मुलींवर पैसे उधळण्यास सुरुवात करतात. बाहेर आवाज जाणार नाही, अशा पद्धतीचा ध्वनिप्रतिरोधक हॉल बांधण्यात आलेला असल्याने आतमध्ये डान्स चालू आहे की नाही, लक्षात येत नाही. डॉल्बी सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. या गाण्यावर बारबाला डान्स करून ग्राहकांचे मनोरंजन करतात. 

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००५ मध्ये राज्यातील सर्वच डान्स बारवर बंदी घातली होती. मुंबईसह राज्यात डान्स बार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती.  शहर व जिल्ह्यात एकाही डान्स बारला परवानगी नाही. ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आॅर्केस्ट्रा बारला मंजुरी दिली जाते. शहरात एकूण ८ आॅर्केस्ट्रा बारला परवानगी आहे. जिल्ह्यात मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तर बार्शी रोडवर दोन आॅर्केस्ट्रा बार सुरू आहेत. शहर हद्दीत पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर, केगाव, बार्शी रोड, सोरेगाव, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी आॅर्केस्ट्रा बार सुरू आहेत. रात्री साडेबारा वाजेपर्यंत वेळ असलेल्या या आॅर्केस्ट्रा बारची खरी सुरुवात रात्री दहा नंतर होते. 

नृत्याला दाद देणारा खरा ग्राहक येण्यास सुरुवात होते. जेव्हा मद्य पोटात जाते तसा ग्राहकांचा मूड पाहून नर्तिका आपली कला सादर करण्यास सुरुवात करतात. मग काय पैशाचा पाऊस पडतो आणि बेधुंद वातावरणाची निर्मिती होते. जोपर्यंत पैशाचा पाऊस पडतो तोपर्यंत बारबालांची छमछम सुरू असते. कधी कधी पहाटे ५ वाजेपर्यंतही हा खेळ चालतो. 

कर्नाटक राज्यातून येणाºया ग्राहकांची संख्या मोठी...- शहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारमध्ये असलेल्या मुली व महिलांचा डान्स पाहून मनोरंजन करण्यासाठी कर्नाटक राज्यातून अनेक ग्राहक येत असतात. कर्नाटकातील राजकीय नेते, बडे उद्योगपती आदी मोठमोठी असामी व्यक्ती सोलापुरात येतात. एका रात्रीत लाखो रुपयांची उधळण करून ही मंडळी निघून जातात. सीमेवर असलेल्या गुलबर्गा, विजयपूर, इंडी, बीदर आदी भागातून ग्राहक आॅर्केस्ट्रा बारमध्ये येतात. 

टॅग्स :Solapurसोलापूरdanceनृत्यPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस