१२ कोटी २४ लाखांची थकबाकीपोटी बारामती, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार थकबाकीदारांची वीज तोडली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:13 PM2018-02-27T15:13:39+5:302018-02-27T15:13:39+5:30

महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीज बिलांचे थकबाकीदार असलेल्या ३९ हजार १७४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला.

Baramati, Satara, Solapur district disrupted power of 40 thousand people due to dues of 12 crore 24 lakh | १२ कोटी २४ लाखांची थकबाकीपोटी बारामती, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार थकबाकीदारांची वीज तोडली  

१२ कोटी २४ लाखांची थकबाकीपोटी बारामती, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार थकबाकीदारांची वीज तोडली  

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती परिमंडलात वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरू बारामती, सातारा व सोलापूर मंडलात १२ कोटी २४ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी ३९ हजार १७४ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित थकबाकी व चालू वीज बिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंदे्र सुटीच्या दिवशी सुरू राहणार


आप्पासाहेब पाटील 
सोलापूर दि २७ : महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीज बिलांचे थकबाकीदार असलेल्या ३९ हजार १७४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला. 
बारामती परिमंडलात वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरू झाली आहे. रविवार दि. २५ फेबु्रवारीअखेर बारामती, सातारा व सोलापूर मंडलात १२ कोटी २४ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी ३९ हजार १७४ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा ४ हजार ६१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ३ कोटी ६६ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील ७ हजार ४१० थकबाकीदारांचा वीजपुरवठा १ कोटी ४१ लाखांच्या थकीत वीज बिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. तर सोलापूर मंडलातील २७ हजार ७०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ७ कोटी १७ लाखांच्या थकीत वीज बिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. 
या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीज बिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंदे्र सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ‘आॅनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
------------------------
 सुट्टीच्या दिवशीही विशेष पथके...
बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुटीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकाºयांचे विशेष पथक सुट्टीच्या दिवशीही बारामती परिमंडलात विविध ठिकाणी भेटी देऊन थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेल्या कारवाईबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविणार आहेत.
----------------
ज्या ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे़ त्या ग्राहकांनी त्वरीत थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा वीज तोडण्यात येईल़ वीज वसुलीसाठी महावितरण यंत्रणेकडून विविध पथके तयार करण्यात आलेली आहेत़ सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केदं्रे सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे़
- ज्ञानदेव पडळकर,
अधिक्षक अभियंता, सोलापूर

Web Title: Baramati, Satara, Solapur district disrupted power of 40 thousand people due to dues of 12 crore 24 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.