शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

बारामतीच्या उद्योजकाचा उजनी धरण परिसरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:22 IST

 या घटनेमागील कारणाचा शोध घेत जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिली.

ठळक मुद्दे- पुणे -सोलापूर महामार्गावरील पळसदेव हद्दीत झाला खून- मृतदेह उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाखाली टाकले- पोलीसाची तपासाची चक्रे वेगात

टेंभुर्णी :  बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील उद्योजक दादासाहेब गणपत साळुंके (वय ३२) यांचा पुणे -सोलापूर महामार्गावरील पळसदेव हद्दीत खून करून मृतदेह उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाखाली टाकण्यात आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १२ आॅक्टोबरच्या सकाळी १०.३० वा. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर येथील भीमा नदीपात्रात पुलाखाली एका अनोळखी तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला होता. या तरुणाचा निर्घृण खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमागील कारणाचा शोध घेत जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, दादासाहेब साळुंके यांचा मिनरल वॉटरचा प्लॅन्ट आहे़ ते मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय करायचे़ त्यांनी गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास इंदापूर भिगवन दरम्यान महामार्गावर असलेल्या सूर्या हॉटेल येथे जेवण केले़ तेव्हा ते एकटेच होते, असे वेटरने सांगितले. जेवण करून ते त्यांच्या एम.एच. ४२/ ६४०० या स्विफ्ट कारने निघाले असता जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली होती़ ती व्यक्ती कारमध्ये बसली असेही वेटरने पोलिसांना सांगितले.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. आम्ही लवकरच खुन्यापर्यंत पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ अज्ञात आरोपींविरुद्ध ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसBaramatiबारामतीPuneपुणे