शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

जानकरांनी फोडला मोहिते-पाटलांना घाम; मात्र शेवटच्या टप्प्यात ‘कमळा’त फुलला राम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:41 PM

Malshiras Vidhan Sabha Election Results 2019: माळशिरस विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई;  राम सातपुते यांचा निसटता विजय

ठळक मुद्देविधानसभेच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर भाजपचे राम सातपुते यांचा निसटता विजय झालाराम सातपुते (भाजप) यांना १ लाख ३ हजार ५०७ तर उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी) यांना १ लाख ९१७ मते मिळाली मागील निवडणुका पाहता हा सामना रोमहर्षक झाला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच त्यांचा गड ढासळला

राजीव लोहोकरे/ एल. डी. वाघमोडे । 

अकलूज/माळशिरस : विधानसभेच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर भाजपचे राम सातपुते यांचा निसटता विजय झाला. राम सातपुते (भाजप) यांना १ लाख ३ हजार ५०७ तर उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी) यांना १ लाख ९१७ मते मिळाली. त्यामुळे २५९० मतांनी राम सातपुते विजयी झाले. मागील निवडणुका पाहता हा सामना रोमहर्षक झाला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच त्यांचा गड ढासळला आहे. तर भाजपने या ठिकाणी पहिल्यांदा खाते उघडले आहे; मात्र हा विजय राम सातपुतेसाठी मानाचा असला तरी, मोहिते-पाटील गटाला करावा लागलेला संघर्षाच्या दृष्टीने निसटता विजय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक संघर्षाची परंपरा जपत विरोधी गट विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता; त्यावेळी जानकरांनी अक्षरश: घाम फोडला होता; पण शेवटच्या टप्पात ‘कमळा’त ‘राम’ फुलला.

सकाळी ९ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी ५ हजार ६९ मतांची आघाडी घेतली. हा आकडा वाढत जात १२ व्या फेरीत १६ हजार ५९७ मतांची आघाडी घेतली; मात्र १३ व्या फेरीपासून हा मतांचा आलेख खाली येऊ लागला. अखेर २१ व्या फेरीत २ हजार ८५३ मतांनी भाजपच्या राम सातपुते यांनी आघाडी घेतली. २२ व २३ व्या फेरीत मताधिक्य कमी झाले. २४ व्या फेरीत २ हजार ३११ मताधिक्य मिळविले तर अखेरच्या फेरीत २०६८ मतांची आघाडी मिळाली व पोस्टल ५२२ मतात आघाडी घेत २५९० मतांनी राम सातपुते विजय ठरले.

मतमोजणीसाठी दोन्ही गटातील नेतेमंडळी सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात दिसत होते. मतमोजणीचे निकाल हाती येत असताना भाजपमध्ये थोडे चिंतेचे वातावरण पसरले होते़ शेवटच्या काही फेºयांपर्यंत दोन्ही गटातील उत्सुकता कायम होती. भाजपचे उमेदवार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, हनुमंत सूळ, मिलिंद कुलकर्णी, काकासाहेब मोटे, नामदेव वाघमारे, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची अनुपस्थिती असली तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून अजय सकट, गौतम माने, बाळासाहेब लवटे, दादासाहेब वाघमोडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राज कुमारसह अपक्ष उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला.

 मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतदान मोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी होती. मतमोजणी केंद्रासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.  मतमोजणी गोदामापासून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सकाळी ८़१५ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी ३ वाजता प्रक्रिया पूर्ण झाली. 

  • - सकाळपासूनच दोन्ही गटाच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती़
  • - सुरुवातीपासून उत्तमराव जानकर यांना लीड मिळत गेल्याने भाजप कार्यकर्ते चिंतेत
  • - अखेरच्या क्षणी राम सातपुते विजयी झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
  • - मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त
  • - विजयी मिरवणूक न काढता अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास पुष्पहार घालून गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी.
टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmalshiras-acमाळशिरसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील