शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील एटीएम व्हॅन लुटीचा बनाव अखेर उघड, बँकेच्या अधिका-यानंच लुटली 70 लाखांची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:04 IST

बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कमेचा शोध घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आहे. पोलिसांनी लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कम सापडली असून या प्रकरणात बँकेच्या अधिका-यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर -  बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कमेचा शोध घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आहे. पोलिसांनी लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कम सापडली असून या प्रकरणात बँकेच्या अधिका-यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सांगोला शाखेचा व्यवस्थापक फिर्यादी अमोल भोसले हाच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर ) रात्री उशीरा पंढरपूर पोलिसांनी मंगळवेढ्यातील एका गावातून 70 लाख रुपये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बँक व्यवस्थापक अमोल भोसले हा कर्जबाजारी झाला होता.  सांगोल्याला येण्याआधी मंगळवेढा तालुक्यातील नदेश्वर शाखेला व्यवस्थापक होता. त्यावेळी त्याची ओळख शेजारील गावातील काही तरुणांशी झाली होती. लुटीचा बनाव करण्यासाठी त्याने या तरुणांना हाताशी धरले. ''निम्मे तुम्ही, निम्मे आम्ही' या तत्त्वावर हे तरुण लुट करण्यासाठी तयार झाले. चित्रपटाची पटकथा असावी, अशी कथा भोसलेनी तयार केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या बनवा-बनवीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. चौकशीची सुरुवातच भोसलेपासून केली. चौकशीदरम्यान, व्यवस्थापक भोसलेचे आयडिया कंपनीचे सिम कार्ड घटनास्थळी सापडले होते. तसेच व्यवस्थापक भोसले हा सुरुवातीपासूनच उडवाउडवीची उत्तरे देत असल्यानं पोलिसांनी संशय आला व या लुटीमध्ये भोसलेचाच हात असल्याचं उघड झालं. 

नेमकी काय आहे घटना?

बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून अज्ञात चोरट्यांनी 70 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून 70 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. ही घटना सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बँक ऑफ इंडिया या बँकेची व्हॅन सांगोला तालुक्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी पंढरपूरहून निघाली होती. ही गाडी सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ आली असता अज्ञात चोरट्यांनी बेलेरो गाडीत येऊन पैसे घेऊन जाणा-या व्हॅनच्या समोर आडवी लावली. यानंतर गाडीत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून त्यांना मारहाण केली व गाडीतील 70 लाख रूपये लुटले. रक्कम लुटल्यानंतर चोरटे पंढरपूरच्या दिशने पसार झाल्याची माहिती समोर आली होती  

टॅग्स :Crimeगुन्हा