बांगलादेशी घुसखोर युवकास सोलापूरात अटक
By Admin | Updated: January 25, 2017 17:07 IST2017-01-25T17:07:27+5:302017-01-25T17:07:27+5:30
बांगलादेशातून विनापासपोर्ट सोलापूरात येऊन गेल्या काही महिन्यांपासून इथं वास्तव्य करणा-या एका बांगलादेशी युवकाला ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी अटक केली.

बांगलादेशी घुसखोर युवकास सोलापूरात अटक
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 25 - बांगलादेशातून विनापासपोर्ट सोलापूरात येऊन गेल्या काही महिन्यांपासून इथं वास्तव्य करणा-या एका बांगलादेशी युवकाला ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी अटक केली. रब्बी जगुल शिकदार (वय २० रा. बांग्लादेश, सध्या मुळेगाव, सोलापूर)असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुळेगाव येथील सोनांकुर स्लॉटर येथे पोलिसांनी छापा टाकून कामगारांची चौकशी केली. त्यावेळी गेल्या दीड वर्षोपासून रब्बी हा सोलापूरातील सोनाई कत्तल खान्यात काम करत असल्याचे त्यांने पोलिसांनी कबुली दिली.
त्याने बेनापोल सीमा येथून भारतामध्ये प्रवेश केला. कलकत्ता भुवनेश्वर या मार्गे सोलापूरला आला. त्याच्या सोबत भुतकी नावाचा आणखी एक तरुण होता. पण तो बंगलादेशला परत गेला. भुतकी याच्या ओळखीने रब्बी सध्या सोनाई कत्तलखान्यात पॅकिंग विभागात कामाला लागला होता, अशी माहिती त्यांने पोलिसांना दिली. त्याला संध्याकाळी चारला न्यायालयात हजर केले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.