आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने बंडू शिंदे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:01+5:302021-01-21T04:21:01+5:30

कुर्डूवाडी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बंडू शिंदे यांना रोटरी क्लबच्या वतीने आदर्श विस्ताराधिकारी पुरस्कार देऊन ...

Bandu Shinde honored with Adarsh Extension Officer Award | आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने बंडू शिंदे सन्मानित

आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने बंडू शिंदे सन्मानित

कुर्डूवाडी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बंडू शिंदे यांना रोटरी क्लबच्या वतीने आदर्श विस्ताराधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रामचंद्र कोरडे व प्रांतपाल हरीश मोटवानी यांच्या हस्ते माढ्यातील जगदाळे मंगल कार्यालयात या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला.

शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बंडू शिंदे यांनी मोहोळ व माढा तालुक्यात मागील १३ वर्षापासून प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम केले आहे. या पुरस्काराबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, माढा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी कौतूक केले आहे.

----

फोटो : २० रोटरी क्लब

Web Title: Bandu Shinde honored with Adarsh Extension Officer Award