शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील आषाढी वारीसाठी मोहिते -पाटलांचा बलराज अश्व देहुकडे रवाना

By appasaheb.patil | Updated: June 27, 2024 15:27 IST

देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पताकाधारी स्वारारुढ मोहिते -पाटील यांचा बलराज अश्व गुरूवारी दुपारी पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करून देहुकडे रवाना झाला. 

राजीव लोहकरे

अकलूज : देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पताकाधारी स्वारारुढ मोहिते -पाटील यांचा बलराज अश्व गुरूवारी दुपारी पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करून देहुकडे रवाना झाला. दरम्यान, ५ वर्षे वयाचा बलराज उदयपूर राजघराण्यातील जातीवंत मारवाड अश्वाचा अबलख वंश असून त्याचे हे सोहळ्यातील ३ रे वर्ष आहे. पालखी सोहळ्यातील रिंगणात देवाचा व पताका धारी स्वाराचा असे दोन मानाचे अश्व असतात. त्यापैकी पताकाधारी स्वाराचा अश्व देण्याची प्रथा गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सुरु केली असून ती प्रथा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे पुढे चालवित आहेत.

मोहिते पाटील कुटुंबाकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीही अश्व दिला जायचा. मात्र पुढे सुमारे ४० वर्षापुर्वी श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अश्व अचानक आजारी पडल्याने देहु संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी स्व.प्रतापसिंह मोहिते‌ पाटील यांच्याकडे एक अश्व कायमस्वरुपी देण्याची मागणी केली, ती त्यांनी मान्य केली. ती परंपरा आजतागायत जपली आहे.

या सोहळ्याला जाण्यापूर्वी या बलराज अश्वाची व्यवस्थित निगा राखावी लागते. त्याचा खुराक, व्यायामासाठी आमचे कर्मचारी घोडेस्वार वैभव गायकवाड, घोडा सेवेकरी तुळशिराम पवार,अजित पवार, अनिल चव्हाण, एकनाथ जावीर व राजु निकाळजे कष्ट घेत असतात असे सांगितले. यावेळी माणिकराव मिसाळ, सतिश पालकर, आण्णासाहेब इनामदार, आण्णासाहेब शिंदे, मयुर माने, सचिन गायकवाड, रंजित देशमुख, नवनाथ साठे, निखिल पुले, नितिन साखळकर, चंदकांत कोळेकर, रवी यादव, शहाजी आघाडे, श्रीमंत लांडगे, ज्योती कुंभार जनसेवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.