शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बालाजीला देवदर्शनासाठी गेलेले सांगोल्याचे तिघे अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 10:51 IST

सांगोला : बालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील ...

ठळक मुद्देदोघे जखमी : कार-एसटी बसची अनंतपूरमजवळ समोरासमोर धडकबालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडकजेव्हा पोलिसांकडूनच दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत व गजानन पाटील ठार झाल्याचे समजले तेव्हा आम्हा मित्रांना धक्काच बसला

सांगोला : बालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचपैकी दोघे जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील दोघा जखमींवर बत्तमपल्ली व अनंतपूरम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात ११ रोजी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी चेन्नई-तिरुपती हायवेवर अनंतपूरमपासून ४० कि.मी. अंतरावर बत्तमपल्ली या ठिकाणी घडला़ दादासाहेब यशवंत लांडगे (वय ४५, रा़ माळवाडी, ता़ सांगोला), प्रमोद सुनील राऊत (वय २३, राक़डलास), गजानन राजाराम पाटील (वय २५, रा़ लोणविरे) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. मारुती बबन गवळी (वय १९, रा़ कडलास) व राजू मधुकर वेदपाठक (रा़ वाटंबरे) अशी जखमींची नावे आहेत. 

सांगोला येथील दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत, गजानन पाटील, मारुती गवळी व राजू वेदपाठक असे पाच मित्र दादासाहेब लांडगे यांच्या मालकीच्या एम. एच. ४५ ए़ डी़ ५०८४ या स्विफ्ट कारमधून रविवारी दुपारी ३ च्या सुमारास सांगोल्यातून तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेले होते. रात्रभर प्रवास करुन त्यांची कार चेन्नई-तिरुपती हायवेवरुन जात असताना अनंतपूरमपासून ४० कि.मी़ अंतरावर बत्तमपल्ली गावाजवळ आली असता आंध्रप्रदेश परिवहनच्या ए. पी. २६ झेड ०२१८ या बसला समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

अपघात इतका भीषण होता की, कार बसच्या डाव्या बाजूला घुसल्यामुळे पुढील संपूर्ण भाग चक्काचूर झाल्याने कारमधील दादासाहेब लांडगे व प्रमोद राऊत हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक व्ही. रामप्रसाद, पोलीस कर्मचारी वल्ली, हरिनाथ रेड्डी, आनंद या पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तत्काळ उपचारासाठी बत्तमपल्ली व अनंतपूरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान गजानन राजाराम पाटील यांचा मृत्यू झाला. 

जखमींपैकी मारुती गवळी याच्यावर बत्तमपल्ली येथील आदिती हॉस्पिटलमध्ये तर राजू वेदपाठक यांच्यावर अनंतपूरम येथील सवेरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमी व मृतांचे नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

शेवटच्या कॉलवरून साधला संपर्क- अपघात घडण्यापूर्वी सकाळी ६़२३ च्या सुमारास गजानन पाटील यांनी कारमधील मित्रांच्या गु्रपचा सेल्फी आपला मित्र राहुल शिंदे याच्या मोबाईलवर शेअर केला होता. त्यावेळी राहुलचा मोबाईल रेंजमध्ये नव्हता. परंतु तो जेव्हा कामावर सांगोल्यात आला तेव्हा मित्राने शेअर केलेला फोटो पाहिला. दरम्यान रविवारी रात्री १० वाजता गजाननने राहुलला फोन करुन जेवण झाले का? अशी विचारणा केली तेव्हा राहुलने हो, जेवण झाले आहे़ सावकाश जा, असा सल्ला दिला होता.

दरम्यान रात्री १० वाजता केलेला हा लास्ट कॉल पाहूनच बत्तमपल्ली पोलिसांनी राहुलशी संपर्क साधून कार अपघाताची माहिती दिली. मात्र मित्राने ६ वाजून २३ मिनिटांनी कारमधील गु्रप सेल्फी पाठवून दिला होता आणि हे असे कसे घडू शकते? मला आताच त्याने सेल्फी पाठविला होता असे म्हणून त्याने अपघाताविषयी हळहळ व्यक्त करुन अपघाताची माहिती गजाननच्या कुटुंबीयांना दिली.

व्यवसायातील मित्रमंडळी- अपघातातील पाच मित्रांपैकी दादासाहेब लांडगे हे हार-फुले विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. प्रमोद राऊत याचा मायाक्का माऊली कॉम्प्लेक्समध्ये टेलरिंग मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. गजानन पाटील हा मायाक्का माऊली कॉम्प्लेक्समधीलच महालक्ष्मी मॉलमध्ये कामगार होता. मारुती गवळी याचे सांगोला स्टेशन रोडवरील जुन्या रेल्वे गेटजवळ सलूनचा व्यवसाय आहे. राजू वेदपाठक यांचे वाटंबरे येथे सराफ दुकान आहे. मृत प्रमोद राऊत याचे वडील सुनील राऊत हे मंगल कार्यालय चालवत असून, केटरिंगचाही व्यवसाय करतात.

तो ‘सेल्फी’ अखेरचा ठरला- बत्तमपल्ली पोलिसांनी गजानन पाटील याच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल पाहून मित्र राहुल शिंदे याला महाराष्ट्रातील कारला अपघाताची माहिती देऊन एकजण ठार झाल्याचे कळविले होते. मात्र ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सांगितले नव्हते. सोमवारी दिवसभर या अपघाताविषयी जसजशी चौकशी होत गेली तसतसा मृताचा आकडा एकवरुन तीनवर पोहोचला आणि अपघातात आपला मित्र गजानन पाटील ठार झाल्याचे समजले.  

जेव्हा पोलिसांकडूनच दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत व गजानन पाटील ठार झाल्याचे समजले तेव्हा आम्हा मित्रांना धक्काच बसला कारण प्रमोद राऊत याने कारमधील तिघांचा सेल्फी काढून तो व्हॉट्स अ‍ॅपवर डीपी ठेवला होता. ती वेळ ६़२३ मिनिटांची होती. त्यानंतर ६़५० मिनिटांनी कार व एस. टी. बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातावर आमचा विश्वासच बसत नव्हता कारण तो सेल्फी अपघातापूर्वीचा होता. तोच सेल्फी मित्रपरिवाराचा अखेरचा सेल्फी ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट