भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बालाजी साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:28 IST2021-02-25T04:28:14+5:302021-02-25T04:28:14+5:30

नरखेड: मोहोळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बालाजी साठे यांची तर उपसरपंचपदी सुधीर कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली. ...

Balaji Sathe as Sarpanch of Bhoyare Gram Panchayat | भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बालाजी साठे

भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बालाजी साठे

नरखेड: मोहोळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बालाजी साठे यांची तर उपसरपंचपदी सुधीर कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक अधिकारी म्हणून सिद्धेश्वर निबंर्गी यांनी काम पाहिले. तलाठी अरविंद तारडे यांनी निवडणूक कार्याला सहकार्य केले. भोयरे ग्रामपंचायतसाठी एकूण नऊ जागा असून सरपंचपद सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित आहे. तुकाराम खोचरे, बालाजी साठे, ब्रम्हदेव फंड, राजकुमार पाटील यांच्या जगदंबा स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीने जगदंबा ग्रामविकास आणि जगदंबा परिवर्तन ग्रामविकास आघाडीचा ९ पैकी ९ जागा जिंकून पराभव केला. सरपंच व उपसरपंच यांचा यावेळी सत्कार झाला. यावेळी ब्रह्मदेव फंड, तुकाराम खोचरे, राजकुमार पाटील बाबासाहेब जाधव, आप्पासाहेब थोरबोले, नेताजी पाटील, भारत साठे, सचिन खोचरे,वामन साठे, अप्पासाहेब साठे, आण्णासाहेब पवार, युवराज चव्हाण, आप्पा फंड उपस्थित होते.

---

२४ बालाजी साठे

२४ सुधीर कोळेकर

Web Title: Balaji Sathe as Sarpanch of Bhoyare Gram Panchayat