बी. एम. नेने यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST2021-01-20T04:22:57+5:302021-01-20T04:22:57+5:30

बार्शी : अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. बी. एम. नेने यांचा प्रथम स्मृतिदिन पार ...

B. M. Greetings to Nene | बी. एम. नेने यांना अभिवादन

बी. एम. नेने यांना अभिवादन

बार्शी : अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. बी. एम. नेने यांचा प्रथम स्मृतिदिन पार पडला. संस्थेच्या प्रांगणात मंगळवारी पार पडलेल्या कार्यक्रमात नेने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल यांनी डॉ नेने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष बन्सीधर शुक्ला, संचालक प्रशांत कथले, संचालक मनीष चौहाण, डॉ. योगेश सोमानी, डॉ. आनंद सोपल, प्रशासकीय अधिकारी किशोर परांजपे, डॉ. योगेश कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती. हॉस्पिटलमधील रुग्णांना दिलीप सोपल व इतर मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. (वा. प्र.)

---

फाेटो : १९ बार्शी नेने

डॉ. बी. एम. नेने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजीमंत्री दिलीप सोपल, बन्सीधर शुक्ला, प्रशांत कथले, मनीष चौहाण

Web Title: B. M. Greetings to Nene