जागतिक एड्स दिनानिमित्त पार्क चौक येथे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:49+5:302020-12-05T04:43:49+5:30
एचआयव्ही, एड्स या आजारासोबत कोरोना या संसर्गजन्य आजारापासून बचाव कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयात कार्यक्रम ...

जागतिक एड्स दिनानिमित्त पार्क चौक येथे जनजागृती
एचआयव्ही, एड्स या आजारासोबत कोरोना या संसर्गजन्य आजारापासून बचाव कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पार्क चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना आणि एड्स या आजाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे युवकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी महापालिका सभागृह नेते श्रीनिवास करली, राजू हौशेट्टी, डाॕॅ. श्रीकांत येळेगावकर, शहीद अशोक कामटे विचारमंचचे अध्यक्ष, योगेश कुंदूर, श्रीनिवास पुरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र परदेशी, सुरत्न गायकवाड, नितीन श्रीसिद्धगणेश, अजहर जमादार, शिवा खोबरे, सदा खोबरे, सुहास पवार, सुधीर आळगी, विजयकुमार हणमगावकर. आरती हणमगावकर यांनी परिश्रम घेतले.
----
फोटोओळ- ‘जागतिक एड्स दिन’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित श्रीनिवास करली, राजू हौशेट्टी, यौगेश कुंदूर, अनिरूध्द ओझा, डाॕॅ.श्रीकांत येळेगावकर, वीरेंद्र परदेशी, सुरत्न गायकवाड आदी
*****