पाटकुलमध्ये शिक्षकांकडून कोरोना विषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST2021-03-28T04:21:48+5:302021-03-28T04:21:48+5:30

गावातील व्यावसायिकांसह गावातील लोकांना मास्कसह सर्व नियम पाळा, विना मास्क कोणालाही दुकानात प्रवेश देऊ नका असे आवाहन ...

Awareness about Corona from teachers in Patkul | पाटकुलमध्ये शिक्षकांकडून कोरोना विषयक जनजागृती

पाटकुलमध्ये शिक्षकांकडून कोरोना विषयक जनजागृती

गावातील व्यावसायिकांसह गावातील लोकांना मास्कसह सर्व नियम पाळा, विना मास्क कोणालाही दुकानात प्रवेश देऊ नका असे आवाहन सरपंच शिवाजी भोसले यांनी जनजागृती रॅली दरम्यान केले.

त्याबरोबरच लसीकरणासाठी जनजागृती व को-मार्बीड सर्वेक्षण, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, कोरोना चाचणी व लसीकरणासाठी आधार कार्ड लिंक करणे याबाबत गृहभेटीतून मुख्याध्यापक नंदकुमार वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

लसीकरणासाठी पाटकूल प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिंदुराव काळे यांनी सांगितले आहे.

सर्वेक्षणात शिक्षक दत्तात्रय चौधरी, संतोष साठे, अतुल क्षीरसागर, नंदलाल नरवणे, गणेश वाघमारे, संगीता वसेकर, बा. ज्ञा. मेलगे, सुजाता दीक्षित, रूपाली गायकवाड, रूपाली माळी,काझी, आशा वर्कर सुनंदा कोळी, संगीता सातपुते, अर्चना काटे, प्रियंका काटे, रंजना टोणपे, वनिता ननवरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस रंजना घोडके, निलावती राऊत, शितल साळुंखे,अपर्णा गोपीनंदन,शेलार,घोडके,सारिका गवळी, भोसले, काळे, केसकर यांचा समावेश आहे.

----

Web Title: Awareness about Corona from teachers in Patkul