राजेंद्र गिरमे यांना विकासरत्न पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:32+5:302020-12-05T04:46:32+5:30

माळीनगर साखर कारखाना मोलॅसिस व ग्रीन बेस्ड डिस्टिलरी, को-जन प्रकल्पाच्या उभारणीत राजेंद्र गिरमे यांचा मोलाचा वाटा आहे. हे सर्व ...

Awarded Vikas Ratna to Rajendra Girme | राजेंद्र गिरमे यांना विकासरत्न पुरस्कार प्रदान

राजेंद्र गिरमे यांना विकासरत्न पुरस्कार प्रदान

माळीनगर साखर कारखाना मोलॅसिस व ग्रीन बेस्ड डिस्टिलरी, को-जन प्रकल्पाच्या उभारणीत राजेंद्र गिरमे यांचा मोलाचा वाटा आहे. हे सर्व प्रकल्प त्यांनी सक्षमपणे चालवून कारखान्यास वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन सोसायटी, महात्मा फुले पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.

यावेळी संस्थेचे सचिव सुरेश गिरमे, मधुकर जगताप, नरेंद्र गिरमे, के. बी. कुलकर्णी, महात्मा फुले पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेव एकतपुरे, गहिनीनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिरीष फडे, डाॅ. भूषण म्हेत्रे, संपर्क अधिकारी अनिल बनकर, संग्राम भोसले, योगेश कचरे, ज्ञानराज व्यवहारे, बापू बनकर, अशोक कांबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, आकाश राऊत, बाळू कणगी, नानासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी ::::::::::::::::::::

राजेंद्र गिरमे यांना माळीनगर विकासरत्न पुरस्कार देऊन गौरव करताना ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत कुदळे व सदस्य.

Web Title: Awarded Vikas Ratna to Rajendra Girme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.