शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीतील पोलिसांना दररोज मोफत भाजीपाला देणारा बळीराजा...!          

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:10 IST

लॉकडाऊनमध्ये दिलासा; बीबीदारफळच्या शेतकºयाने स्वत:च्या पैशातून हा उपक्रम सुरू केला

ठळक मुद्देकोरोनामुळे शहर व जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहेहातावरचे पोट असणाºया लोकांची सध्या तारांबळ उडाली आहे गावांतील हातावर पोट असलेल्या लोकांना ज्वारी, तेल व भाजीपाला वाटप केला

 सोलापूर : संचारबंदीनिमित्त रस्त्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना दररोज मोफत भाजीपाला दिला जात आहे. सध्याची गरज ओळखून बीबीदारफळच्या शेतकºयाने स्वत:च्या पैशातून हा उपक्रम सुरू केला आहे.

विजयकुमार पांडुरंग साठे (वय ३३) हे बीबीदारफळ येथील शेतकरी आहेत. गावात त्यांना चार एकर शेती आहे. कोरोनामुळे शहर व जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हातावरचे पोट असणाºया लोकांची सध्या तारांबळ उडाली आहे. या स्थितीचा विचार करून एक महिन्यापूर्वी विजयकुमार साठे यांनी पाकणी व अन्य गावांतील हातावर पोट असलेल्या लोकांना ज्वारी, तेल व भाजीपाला वाटप केला. 

हे करत असताना त्यांनी रस्त्यावर जागोजागी थांबलेल्या पोलिसांचा विचार केला. हे पोलीस २४ तास जनतेसाठी रस्त्यावर उभे आहेत, त्यांनाही आपण भाजीपाला दिला पाहिजे असा विचार केला.

स्वत:चे शेत असले तरी त्यांनी जवळचे अडीच ते तीन हजार रुपये खर्चून गावातील अन्य शेतकºयांकडून दररोज टोमॅटो, वांगी, शेवगा, भेंडी, मिरची, गवारी असा भाजीपाला पिशवीत घालून दररोज २00 ते २५0 पिशव्या तयार करू लागले. या पिशव्या ते मोहोळ पोलीस स्टेशन, महामार्गावर रस्त्यावर ड्युटी करणारे पोलीस, तालुका पोलीस स्टेशन, ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलिसांना देण्यास सुरूवात केली. 

पोलीस हे काय आहे...आम्हाला कशाला देताय असे म्हणत होते. पण शेतकरी प्रेमाने देत असल्याचे पाहून व घरी याची गरज आहे हे ओळखून पोलीस कर्मचारी भाजीपाला स्वीकारू लागले. गेल्या एक महिनाभरापासून विजयकुमार साठे हे भाजीपाला मोफत वाटत आहेत.

कधी चारचाकी तर कधी मोटरसायकलवर- दररोज सकाळी भाजीपाला गोळा करणे, पिशव्यांमध्ये भरणे व तो वाटण्यासाठी बाहेर पडणे हा विजयकुमार साठे यांचा दिनक्रम आहे. या कामाला गावातील शैलेश नानासाहेब चवरे, गणेश दिलीप पवार, समाधान विठ्ठल चवरे, संदीप देवकुळे, अविराज साठे, सचिन पवार, निखिल दुर्लेकर, गणेश साठे, मनोज साठे, राम जाधव, आकाश देवकुळे ही मित्रमंडळी सोबत फिरून मदत करीत आहेत. मित्राच्या बोलेरो जीपमधून तर कधी स्वत:च्या मोटरसायकलवरून ही मंडळी दुपारपर्यंत भाजी वाटप करतात आणि समाधानाने घरी निघून जातात. ग्रामीण पोलिसांकडून सत्कार- विजयकुमार साठे यांचा प्रामाणिकपणा पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून आभार मानण्यात आले.

पोलीसदेखील माणूसच आहे : विजयकुमार साठे- पोलीस हा वर्दीत असल्यामुळे लोकांना तो वेगळा वाटतो, मात्र तोही एक माणूस आहे. सकाळ म्हणायचं नाही, रात्र बघायची नाही. जिथे ड्युटी लागेल तिथे जायचं. मुलाबाळांचा विचार करायचा नाही. आपत्ती नैसर्गिक असो की कृत्रिम संरक्षणासाठी पोलिसांनाच पुढे यावे लागते. सध्या पोलीसच आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर आहेत, याची जाणीव ठेवून  मी माझ्या परीने भाजीपाला वाटप करीत आहे अशी माहिती तरूण शेतकरी विजयकुमार साठे यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीPoliceपोलिस