दुचाकीवरून पडून मावशीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:39 IST2021-02-18T04:39:58+5:302021-02-18T04:39:58+5:30

बार्शी : नातेवाईकातील लग्नसमारंभासाठी बहिणीच्या मुलासमवेत दुचाकीवर बसून निघालेल्या मावशीचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. याप्रकरणी बहिणीच्या मुलाविरोधात बार्शी पोलिसांनी ...

Aunty dies after falling off bike | दुचाकीवरून पडून मावशीचा मृत्यू

दुचाकीवरून पडून मावशीचा मृत्यू

बार्शी : नातेवाईकातील लग्नसमारंभासाठी बहिणीच्या मुलासमवेत दुचाकीवर बसून निघालेल्या मावशीचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. याप्रकरणी बहिणीच्या मुलाविरोधात बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उषा किशोर राऊत (लातूर) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून, बुधवारी पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. हा अपघात बावी-साकत या कच्च्या रस्त्यावर विठ्ठल मंदिराजवळ झाला.

याबाबत गणेश महादेव राऊत (वय ३६, रा. मदने प्लॉट, कांदलगाव रोड, बार्शी ) यांनी पोलिसांना माहिती दिली असून त्यांनी दुचाकीस्वार उमेश महादेव राऊत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, बावी-साकत रोडवर श्रीकृष्ण मंदिरात मंगळवारी नातेवाईकाचा विवाह होता. त्यासाठी उषा या बहिणीचा मुलगा उमेश याच्यासोबत दुचाकीवरुन (एमएच २५, बी. ए.८०१४ ) कच्च्या रस्त्यावरून निघाल्या होत्या. वाटेत त्या लघुशंकेसाठी गाडी थांबविण्यास सांगत असतानाच गाडीच्या सीटवरुन घसरुन खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता औषधोपचार सुरू करत असतानाच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास जनार्दन सिरसाट करत आहेत.

Web Title: Aunty dies after falling off bike