सोलापूरकरांनो..इकडे लक्ष द्या, जून पर्यंत लोकशाही दिन स्थगित
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 28, 2024 18:39 IST2024-03-28T18:39:14+5:302024-03-28T18:39:28+5:30
एप्रिल, मे तसेच ६ जून पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे, जून पर्यंत म्हणजे पुढील तीन महिने लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूरकरांनो..इकडे लक्ष द्या, जून पर्यंत लोकशाही दिन स्थगित
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने पुढील तीन महिने लोकशाही दिन साजरा होणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.
नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. भारतीय निवडणूक आयोगाने १६ मार्च लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. एप्रिल, मे तसेच ६ जून पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे, जून पर्यंत म्हणजे पुढील तीन महिने लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.