मकाईच्या ऑनलाइन सभेला ३४९ सभासदांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST2021-04-01T04:23:18+5:302021-04-01T04:23:18+5:30

शासन नियमानुसार सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली तरी सभासदांनी या सभेसाठी आपला सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला. ऑनलाइन सभेवेळी ठरावातील ...

Attendance of 349 members at the online meeting of Maize | मकाईच्या ऑनलाइन सभेला ३४९ सभासदांची उपस्थिती

मकाईच्या ऑनलाइन सभेला ३४९ सभासदांची उपस्थिती

शासन नियमानुसार सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली तरी सभासदांनी या सभेसाठी आपला सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला. ऑनलाइन सभेवेळी ठरावातील विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सभासदांनी दिले. ठराव वाचन चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. या वर्षातील मान्यवर, माजी कामगारांना कार्यकारी संचालक हरीश खाटमोडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी व्हाइस चेअरमन उत्तम पांढरे, संचालक महादेव गुंजाळ, रामभाऊ हाके, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलवडे, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, बापू कदम उपस्थित होते.

---

कोरोनामुळे यावर्षीची २१ वी सर्वसाधारण सभा आम्ही ऑनलाइन घेतली. ठरावात विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सभासदांना दिले. येणारा ऊस हंगाम मकाई चांगल्या पद्धतीने गाळप करणार आहे.

-दिग्विजय बागल, चेअरमन, श्री मकाई सहकारी साखर कारखाना.

---

मकाई सह. साखर कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सभेप्रसंगी चेअरमन दिग्विजय बागल, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे.

Web Title: Attendance of 349 members at the online meeting of Maize