पहाटे फिरावयास गेलेल्यास हातपाय बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:57+5:302021-09-03T04:22:57+5:30

ही घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटे होऊन याबाबत जखमी झालेले विक्रांत रसाळ (वय ४२, ...

Attempts to kill him by tying his hands and feet if he goes for a walk in the morning | पहाटे फिरावयास गेलेल्यास हातपाय बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न

पहाटे फिरावयास गेलेल्यास हातपाय बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न

ही घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटे होऊन याबाबत जखमी झालेले विक्रांत रसाळ (वय ४२, रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांनी दवाखान्यात पोलिसात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत रसाळ हे पहाटे फिरावयास जाताना शहरानजीक असलेल्या रोडवरील गुळमिरे यांच्या शाळेजवळ येताच पाठीमागून चार जणांनी येऊन त्याचे हातपाय पकडून उचलून घेऊन जातांना ओरडताच पाचव्या इसमाने तोंडात कुकरी घालून आवाज बंद केला. त्यास उचलून एका शेतात नेले. तेथे दोरीने हातपाय बांधून खाली पाडून हातोडीने मारण्यास सुरू केली. याचा पुढील तपास पो. स्वप्निल इज्जपवार करत आहेत.

.........

तोंडात कोंबला कापडी बोळा

ओरडताना तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यावेळी मारेकरी हातोडीने मारताना जखमीने हिसका दिल्याने बोळा खाली पडताच आरडाओरड केला. आवाजाच्या दिशेनी लोक येऊ लागल्याने अज्ञात मारेकरी पळून गेले. त्यानंतर जखमीने पत्नीस मोबाइलवरून हा प्रकार झाल्याचे सांगितले. पत्नी व चुलते राजाभाऊ रसाळ यांनी येऊन रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यातील मारेकऱ्यांनी तोंडाला मास्क लावल्याने चेहरा दिसत नव्हता. तर अंगावर काळ्या रंगाचा सूट होता.

Web Title: Attempts to kill him by tying his hands and feet if he goes for a walk in the morning