सोलापूरात सहायक पोलीस निरीक्षकांस लाच देण्याचा प्रयत्न, महिलेसह तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 20:53 IST2017-07-22T20:53:10+5:302017-07-22T20:53:10+5:30
-

सोलापूरात सहायक पोलीस निरीक्षकांस लाच देण्याचा प्रयत्न, महिलेसह तिघे जेरबंद
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील घरकुल पोलीस चौकीत कार्यरत असलेले शितल कोल्हाळ यांना पाच हजार रुपयांची लाच देताना लाचलुचत विभागाने एका महिलेसह तिघांना जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यातुन दोष मुक्त करण्यांसाठी लता बंडा व दोन बोक्रर यांनी घरकुल पोलीस चौकीत कार्यरत असलेले सपोनि कोल्हाळ यांना पाच हजार रुपयांची लाच देऊन दोषमुक्त करण्यास सांगितले. याबाबत सपोनि कोल्हाळ यांनी लाचलुचत विभागाकडे त्या महिलेची तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांनी सापळा रचुन लता बंडा व दोन ब्रोकरला ताब्यात घेतले.
--------------------
घरकुल पोलीस चौकीत लतावर फसवणुकीचा गुन्हा
घरकुल पोलीस चौकीत लता बडा हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात दोषमुक्त करावे म्हणुन तिने सपोनि कोल्हाळ याना लाच देण्याचा प्रयत्न केला.