हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST2021-05-29T04:18:15+5:302021-05-29T04:18:15+5:30

वेळापूर : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या वस्तीत दारूभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या वेळापूर पोलीस पथकावर वस्तीतील ...

Attack on a police squad that went to the Hatbhatti for action | हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

वेळापूर : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या वस्तीत दारूभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या वेळापूर पोलीस पथकावर वस्तीतील नागरिकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. तसेच अन्य दोन पोलीस जखमी झाले.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या डोक्यावर घाव लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्यासह जखमी पोलिसांना तातडीने वेळापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

---

उपविभागीय अधिकारी धावले घटनास्थळी

या घटनेनंतर अकलूज पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमींची चौकशी केली. प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांकडून घटनेबाबत माहिती घेऊन तातडीच्या सूचना करत तपासाची सूत्रे हाती घेतली. रात्री उशिरा खारतोडे यांना पुढील उपचारासाठी अकलूजमधील खासगी रुग्णालयात हलविले.

Web Title: Attack on a police squad that went to the Hatbhatti for action