शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना चार वर्षांची शिक्षा, सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:11 IST

सत्र न्यायालय : पीडितांच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची

ठळक मुद्देरमेश हणमंतू मिठापल्ली (वय २१), विशाल चंद्रकांत नाईकवाडी अशी शिक्षा झालेल्या दोन मजुरांची नावे या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होताफौजदार सुनीता पौळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सोलापूर : अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन मजुरांना जिल्हा न्यायाधीश-१ सावंत-वाघुले यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावली. 

रमेश हणमंतू मिठापल्ली (वय २१), विशाल चंद्रकांत नाईकवाडी (वय २०, दोघे रा. सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या दोन मजुरांची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दोन अल्पवयीन मुली या एकाच शाळेत शिकत होत्या. १ एप्रिल २०१५ रोजी एक मैत्रीण आपल्या दुसºया मैत्रिणीस सोडण्यासाठी नई जिंदगी येथील चौकात आल्या. 

तेथे दोघी थांबल्या असता ओळखीचे दोघे आरोपी तेथे आले. त्यांनी मुलींना गाडीवर बसण्यास सांगितले. मुली गाडीवर बसल्या असता त्यांना प्रथम अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे नेले. तेथे मुलींचा विनयभंग केला. त्यानंतर दोघींना पुणे येथे नेले. तेथून पुन्हा एका मुलीस रेल्वे स्टेशनवर सोडले व रमेश मिठापल्ली याने दुसरीला पुन्हा पळवून नेले. रेल्वे स्टेशनवर सोडलेल्या मुलीने आपल्या नातेवाईकांना फोन लावून माहिती दिली.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फौजदार सुनीता पौळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारतर्फे अ‍ॅड. शैलजा क्यातम, आरोपीतर्फे अ‍ॅड. अजमोद्दिन शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. चव्हाण यांनी काम पाहिले. 

दहा साक्षीदार तपासले   - या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेचे वडील व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस भादंवि कलम ३६३ अन्वये प्रत्येकी ४ वर्षांची शिक्षा व २ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. पोक्सो कलम ७ व ८ अन्वये प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व १००० रुपयांचा दंड. दंड न भरल्यास १ हजाराचा दंड व दंडाची रक्कम न भरल्यास २ महिन्यांची शिक्षा सुनावली.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी