शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पुणे घाटमाथ्यावर जोर ओसरला, विसर्ग घटला

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 27, 2023 20:44 IST

उजनी प्लसमध्ये येण्यास सात टीएमसी गरज

सोलापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. दौंड येथील विसर्गात घट झाली असून तो १६, ६२० क्युसेक झाला आहे. आता उजनीतील एकूण जलसाठा ५६.७१ टीएमसी झाला आहे. टक्केवारी मायनस ६.९५ वर आली आहे. मागील २४ तासात धरणात १.२४ टीएमसी पाणी आले आहे. धरण प्लस मध्ये येण्यासाठी फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.

उजनीतील पाणीसाठा पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर पडणा-या पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसावर उजनी अनेक वेळा ओव्हर फ्लो झाले आहे. बुधवारपेक्षा गुरुवारी पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला. उजनी धरणाच्यावर १९ धरणांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ वेळेत चांगली वाढ झाली.

वडिवळे २७ मिमी, पवना ३२ मिमी, मुळशी ३४ मीमी, टेमघर ३० मीमी, वरसगाव १७ मीमी व पानशेतमध्ये १७ मीमी पावसाची नोंद झाली. इतर धरण क्षेत्रात नगण्य पाऊस झाला.

वरील धरणाची टक्केवारी:पिंपळ जोगे ४.७९ टक्के, माणिकडोह ३७.१९ टक्के, येडगाव ८० टक्के, वडज ५१ टक्के, डिंभे ५४ टक्के, चिल्लेवाडी ७८ टक्के, कळमोडी १०० टक्के, चासकमान ८७ टक्के '' भामा आसखेड ६७ टक्के, वडीवळे ८९ टक्के, आंध्रा ७७ टक्के, पवना ७५टक्के, कासारसाई ८८.३९टक्के, मुळशी ७० टक्के, टेमघर ५०.३९ टक्के, वरसगाव ६७.४६ टक्के, पानशेत ७४.४९ टक्के, खडकवासला १०० टक्के.

वरीलपैकी चिल्लेवाडी येथून ११५३ क्युसेक, कळमोडी धरणातून १६९६ क्युसेक, वडिवळे धरणातून ४२२३ क्युसेक, कासारसाई येथून ४०० क्युसेक तर खडकवासला धरणातून १७१२क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

बंड गार्डन येथून १०३९१ क्युसेक तर दौंड येथून १६६२० क्युसेकने विसर्ग चालू आहे. दौंड येथून होणारा विसर्ग असाच राहिल्यास पाच दिवसात उजनी प्लस मध्ये येईल असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला.

धरणाची सद्यस्थिती* एकूण पाणी पातळी : ४८९.९८० मीटर* एकूण जलसाठा : ५६.७१ टीएमसी* उपयुक्त जलसाठा : मायनस ६.९५ टीएमसी* टक्केवारी: मायनस १२.९८ टीएमसी

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणे