बार्शी स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेला धक्का देत सोन्याचे पदक पळवले
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 20, 2023 19:38 IST2023-11-20T19:38:01+5:302023-11-20T19:38:09+5:30
सर्वजण बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिला मधूनच घुसून सुमन यांना धक्का मारला

बार्शी स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेला धक्का देत सोन्याचे पदक पळवले
सोलापूर : माहेरी धारशिवला जाण्यासाठी बार्शी बस स्थानकावर बसमध्ये चढणा-या महिलेला धक्का देत तिच्या गळ्यातील सोन्याचे पदक पळवल्याची घटना सोमवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
याबाबत सुमन शशिकांत लोकरे (वय ४७, रा. मुळे प्लॉट, सोलापूर रोड, बार्शी) या महिलेंनी बार्शी शहर पोलीसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी महिला सुमन ही दुपारी मुलगा, जाऊ व मावशी यांच्यासह धारशिवला जाण्यासाठी बार्शी बस स्थानकावर आली. बस येईपर्यंत ते स्थानकावर थांबले. काही वेळात धाराशिव बस आली आणि प्रवाशांनी गर्दी केली. सर्वजण बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिला मधूनच घुसून सुमन यांना धक्का मारला आणि गळ्यातील ३६ हजारांचे सोन्याचे काळे मणी आणि पान्हाडी पदक हिसकावून तेथून पळ काढला. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल रेवन भोंग करत आहेत.