विधानसभा निवडणुकीचे सेनेला वेध

By Admin | Updated: May 27, 2014 00:57 IST2014-05-27T00:57:47+5:302014-05-27T00:57:47+5:30

नेरुरकरांचे आवाहन : शिवसैनिकांनो कार्यक्षमता वाढवा

Assembly election watch | विधानसभा निवडणुकीचे सेनेला वेध

विधानसभा निवडणुकीचे सेनेला वेध

सोलापूर : सोलापूरसह महाराष्टÑातील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे निर्माण झालेल्या उत्साहाचा आगामी विधानसभा निवडणुकीत उपयोग करून घेण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा शिवसेना सरसावली असून, येथे आज झालेल्या बैठकीत शिवसैनिकांना कार्यक्षमतेने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील एका हॉटेलात शिवसेनेची बैठक झाली. तीत विधानसभा निवडणुकीत मतदारांना नेमके कसे आकर्षित करायचे, यावर चर्चा झाली. उस्मानाबादचे संपर्क नेते विश्वनाथ नेरूरकर यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद मतदारसंघात झालेल्या प्रचार अभियानामुळे सेनेला विजय मिळाल्याबद्दल या बैठकीत नेरूरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर ठोंगे-पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. विधानसभेसाठीचा प्रचार नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार आगामी काळात असा कार्यक्रम ठरवून तो राबविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीतील यश संपूर्णत: शिवसैनिकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

-----------------------

मतदार नोंदणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान घेण्यात येणार असून, १ जूनपासून तालुका पातळीवर हे अभियान सुरू होईल. यामध्ये शिवसैनिकांसह नेते, पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

Web Title: Assembly election watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.