जमिनीच्या मोबदल्यासाठी भाच्याचा मामावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:17+5:302021-09-10T04:29:17+5:30
वाढेगाव येथील दीपक ऐवळे हे मंगळवारी गावातील ज्योतिर्लिंग अँग्रो एजन्सी येथे बसले होते. यावेळी भाचा अक्षय नाथा गुळीग, अमर ...

जमिनीच्या मोबदल्यासाठी भाच्याचा मामावर प्राणघातक हल्ला
वाढेगाव येथील दीपक ऐवळे हे मंगळवारी गावातील ज्योतिर्लिंग अँग्रो एजन्सी येथे बसले होते. यावेळी भाचा अक्षय नाथा गुळीग, अमर नाथा गुळीग, भावकीतील संकेत संजय ऐवळे, दाजी नाथा गुळीग हे तेथे आले. त्याने मामा दीपक यांना हायवेमध्ये मिळालेल्या पैशांपैकी आम्हाला अजून पैसे हवे आहेत, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी त्यांनी तू शिव्या देऊ नको तुमच्या हिश्याचे पैसे मी त्याचवेळेस तुम्हाला दिले आहेत, असे सांगितले.
यावेळी त्याने हातातील वेळूच्या काठीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरात फटका मारला. त्यावेळी अमोल गुळीग, संकेत ऐवळे यांनी सोबत आणलेल्या वेळूच्या काठीने हातावर, पाठीत, पायावर तर दाजी गुळीग यांनीही पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणात उजव्या हाताला काठीने जोरदार फटका बसल्यामुळे ते मोठ्याने ओरडले. यावेळी चुलत भाऊ प्रमोद ऐवळे, चुलते भागवत ऐवळे, सख्खा भाऊ शिवाजी ऐवळे, वडील दादा ऐवळे यांनी तेथे येऊन त्यांची भांडणे सोडविली.