शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अशीही जिद्द अन् चिकाटी; गावोगावी फिरून विकला ५ लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:45 IST

२८ हजार ४०० किलोची भाजी : लॉकडाऊनमुळे मुंबईत माल पाठविणे होते बंद

ठळक मुद्देघरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री

सांगोला : कोरोनाच्या ताळेबंदीत शेतीमाल व भाजीपाल्याची साखळी खंडित झाल्यानंतर डिकसळ (ता. सांगोला) येथील प्रकाश गायकवाड यांनी कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष केले. कोरोनाला न घाबरता शेतकºयाकडून भाजीपाला व फळे खरेदी करून ते आई, वडील, पत्नी व भाच्याच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २८ हजार ४०० किलो भाजीपाला व फळे विक्री करून ५ लाखांच्या व्यवसायातून हजारो रूपये कमविले आहेत. डिकसळ येथील प्रकाश गायकवाड हा तरूण मागील १० वर्षांपासून फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तसा प्रकाश शिवसेनेचा शाखाप्रमुख असून आ. शहाजीबापू पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. समाजकारण व राजकारणामध्ये दंग असलेला प्रकाश आज गावासह परिसरात भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी तितकाच प्रसिद्ध आहे.

घरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक आहे. पण थोड्याफार जमिनीमध्ये भाजीपाला व अन्य पिके घेऊन प्रकाश आपला संसाराचा गाडा चालवित आहे. घरी आई, वडील व पत्नीच्या सहकार्याने दूध व्यवसायाबरोबरच पहाटे ५ वाजल्यापासून परिसरातील गावांमधून भाजीपाला व फळे खरेदी करून परिसरातील लोकांसाठी घरपोच सेवा देत आहे.

लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता, परंतु लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रकाशने या कालावधीत शेतकºयांकडून दैनंदिन खरेदी केलेली फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून  विक्री करीत आहे. त्याने फळे व भाजीपाला येळवी, पारे, घेरडी, लोहगाव, वायफळ, हंगिरगे आदी गावांमधील शेतकºयांकडून खरेदी केला व तोच माल नियोजन करून डिकसळ परिसरासह वाड्यावस्त्यांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाड्या वस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या भाजीपाला मिळू लागला आहे.

गावामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये तो सतत प्रकाशमयच असतो. त्याच्या भाजीपाला व्यवसायाला भाचा गणेश शिंदे मोलाची साथ देत असल्यामुळे मामा -भाच्याने मिळून लॉकडाऊनच्या काळात आत्तापर्यंत २८ हजार ४००  किलो फळे व भाजीपाला विक्री करून सुमारे ५ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

अशी केली फळे व भाजीपाला विक्री - टोमॅटो २ हजार ४०० किलो, वांगी ४ हजार किलो,मिरची ६०० किलो,गवार ५ हजार किलो,कांदा ३ हजार किलो,दोडका १ हजार किलो, सिमला मिरची १ हजार किलो ,कारले १ हजार किलो,कोबी ३ हजार किलो इतर पाले भाजीपाला ३ हजार जोड्या तर फळे-चिक्कू ३ हजार किलो, पेरू १ हजार ५०० किलो, कलिंगडे १ हजार किलो असा माल विक्री केला.

मागील दहा वर्षांपासून फळे व भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनपूर्वी हा सर्व माल मुंबईला पाठवित होतो. परंतु लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाला गाव परिसर वाड्यावस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. आत्तापर्यंत ५ लाख ४ हजार रुपये मालाच्या विक्रीतून दरमहा १५ ते २० हजार रुपये इतका नफा मिळाला आहे.- प्रकाश गायकवाड, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे