शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 03:33 IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे.

आप्पासाहेब पाटील 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्र्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू आणि आशाबाई अहिरे दांपत्य यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा सन्मान मिळाला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. बारा ते पंधरा लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त भीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत.

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाची शासकीय पुजा करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येतात. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे. सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. शासकीय महापूजेवेळी राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी  व स्थानिक प्रशासनातील मुख्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. लाखो वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत. पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माऊली माऊली व हरिनामाचा गजर होत आहे. सर्व प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी सहकार्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीEknath Shindeएकनाथ शिंदे