शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सोलापुरातील अरविंद धाम; इनामदारांची स्मृती चिरंतन ठेवणारं काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:37 IST

निवृत्त पोलीस अधिकाºयांच्या भावना : सोलापूरकरांशी जिव्हाळ्याचे संबंध; पोलिसांसाठी सर्वोत्तम वसाहत

ठळक मुद्दे१९८० दरम्यान अरविंद इनामदार हे सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक पदावर होते़जवळपास ९ महिने सोलापुरात होते़ ते शिस्तप्रिय होतेपोलीस हे नेहमी टापटीप असले पाहिजेत़ यासाठी ते खूप शिस्तप्रिय होते

रेवणसिद्ध जवळेकर/रुपेश हेळवे

सोलापूर : एक चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून अरविंद इनामदार यांची पोलिसांमध्ये ख्याती होती. त्यांनी खात्याला लावलेली शिस्त अन् पोलिसांना सातत्याने आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे अरविंद इनामदार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक असताना त्यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला. आज ते आपल्यातून निघून गेले तरी त्यांच्या नावाने असलेले अरविंद धाम त्यांची स्मृती चिरंतन ठेवणारं आहे, या शब्दात पोलीस दलातील निवृत्त अधिकाºयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

पोलीस अन् जनता यातील दरी कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना पोलीस खाते जेव्हा आपलेसे वाटू लागेल, तेव्हाच पोलिसांची प्रतिमा उंचावल्यासारखी आहे, असे ते नेहमी म्हणत असत. पोलिसांमधील माणूस म्हणून काम करताना त्यांनी खात्यात मात्र शिस्तीचेच धडे देत असत. कसं बोलावं, कसं वागावं यावरच त्यांचा कटाक्ष असायचा. पोलीस ठाण्यात अथवा चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्याला खुर्ची द्या, पाणी द्या अन् त्याचे नीट ऐकून घ्या. असे केले तर तक्रारदाराचे निम्मे दु:ख हलके होते, असे ते नेहमी म्हणायचे. आज त्यांचे विचार दलातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांनी आचरणात आणावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, या शब्दात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, पंढरीनाथ मांडरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अधीक्षकच नव्हे तर कडक शिक्षकही होते...- १९८० दरम्यान अरविंद इनामदार हे सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक पदावर होते़ ते जवळपास ९ महिने सोलापुरात होते़ ते शिस्तप्रिय होते़ पोलीस हे नेहमी टापटीप असले पाहिजेत़ यासाठी ते खूप शिस्तप्रिय होते़ केसापासून पायाच्या नखापर्यंत ते शिस्त पाहत होते़ प्रत्येक कर्मचारी हा शिस्तीत असला पाहिजे असे त्यांचे मत होते़ एखादा कर्मचारी जर आपली टोपी खांद्याला लावलेला दिसला तरी त्यावेळी ते कारवाई करत होते़ याचबरोबर दिवसाचे काम पूर्ण करूनच घरी जात होते़ 

पोलिसांच्या आरोग्याचाही विचार- अनु शर्मा- पोलिसांनी नेहमी स्टॅन्डर्ड जीवन जगावे़ ते नेहमी फिट असावेत़ पोलिसांच्या कुटुंबीयासाठी राहण्यासाठी चांगली व्यवस्था असावी़ यासाठी नेहमी प्रयत्न करून पोलिसांसाठी माजी पोलीस अधीक्षक अरविंद इनामदार यांनी सोलापुरात कॉलनी निर्माण केली़ चाळीस घरांची एक बिल्डिंग अशा अकरा बिल्डिंग निर्माण केल्या़ पण पोलिसांची होणारी धावपळ, यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते ही बाब लक्षात घेऊन त्यांचा व्यायाम व्हावा यासाठी बिल्डिंगला लिफ्ट न बसवण्याचा निर्णय माजी पोलीस महासंचालक तथा सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक इनामदार यांनी घेतला होता. त्यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप प्रयत्न केले, अशी आठवण  तत्कालीन लाईन अंमलदार अनु वर्मा यांनी दिली़ 

सोलापुरात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी अरविंद इनामदार यांनी मोलाचे प्रयत्न केले. कर्तव्य पार पाडण्याबरोबर सर्वसामान्यांना चांगली वागणूक  द्या, असे ते नेहमी सांगायचे. अरविंद धामच्या माध्यमातून त्यांचे सतत स्मरण होत राहील. -अभय कटाप, निवृत्त कार्यालयीन अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस दल.

पोलीस दलात भरती झाल्यावर एक वर्षाचे प्रशिक्षण होते. त्यावेळी प्राचार्य म्हणून अरविंद इनामदार यांनी जे धडे दिले, तेच धडे मला पोलीस दलात काम करताना कामाला आले. सोलापुरात त्यांनी जी वसाहत निर्माण केली, आज तीच वसाहत स्व. अरविंद इनामदार यांच्या विचारांची प्रेरणा देत राहील.-मोहन विधाते,निवृत्त सहायक पोलीस आयुक्त. 

अरविंद इनामदार खूप शिस्तप्रिय अधिकारी होते़ त्यांनी पोलीस खात्याला पूर्ण शिस्त लावली होती. गुन्हेगारांवर त्यांचा चांगलाच वचक होता़ त्यांच्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना चांगली वसाहत मिळाली़ अरविंद धामच्या माध्यमातून त्यांचे नेहमीच स्मरण होत राहील.  - अरुण कुलकर्णी,         निवृत्त पीएसआय

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस