तुकोबारायांचे जिल्ह्यात आगमन

By Admin | Updated: July 5, 2014 00:29 IST2014-07-05T00:29:26+5:302014-07-05T00:29:26+5:30

रिंगण सोहळा रंगला; अकलूजच्या मुक्कामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Arrival in Tukobaraya district | तुकोबारायांचे जिल्ह्यात आगमन

तुकोबारायांचे जिल्ह्यात आगमन



अकलूज : टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयजयकारात देहूच्या वाड्यावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आज आगमन झाले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात केले. सोहळ्याचे अकलूज येथे गोल रिंगण होऊन पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला.
देहू ते पंढरपूर असा प्रवास मजल-दरमजल करीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथील मुक्काम आटोपून आज सोलापूर-पुणे जिल्ह्याची सरहद्द नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्यात प्रवेश करताच तोफांच्या सलामीत जिल्हा सरहद्दीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा पोलीस प्रमुख मकरंद रानडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन.एन. मालदार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार विजय पाटील, जि.प. सदस्य मोहनराव लोंढे यांनी पालखी व अश्वाचे पुष्पहार घालून स्वागत केले. तत्पूर्वी पालखी सोहळ्याने सराटीकरांचा निरोप घेण्यापूर्वी नीरा नदीच्या पात्रातील पाण्यात पालखीच्या अश्वांना व पादुकांना स्रान घालण्यात आले.
जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करून अकलूज (ता. माळशिरस) शहरात प्रवेश करताना गांधी चौकात खा. विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, पं.स. सदस्य पांडुरंग देशमुख, पांडुरंगराव देशमुख, फातिमा पाटावाला, सरपंच शशिकला भरते व ग्रामपंचायत सदस्यांनी सोहळ्याचे स्वागत केले.
सदाशिवराव माने विद्यालयातील रिंगण सोहळ्यात अश्व धावण्यापूर्वी झेंडेधारी वारकरी, तुळशी डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाज वादक यांनी रिंगण सोहळ्यास प्रदक्षिणा मारल्यानंतर यंदा प्रथमच पालकमंत्री दिलीप सोपल, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी हे रिंगण सोहळ्यात धावले.
---------------------------------
गैरसमजामुळे घडले...
अश्व बाहेर काढण्याच्या घटनेवर प्रतापसिंह मोहिते - पाटील म्हणाले, माझा अश्व जाणीवपूर्वक राजकीय आकसापोटी बाहेर काढला तर जयसिंह मोहिते - पाटील म्हणाले, तो अश्व पूजा केल्यानंतर घोडेस्वार स्वत:च बाहेर घेऊन गेले. पालखी सोहळा प्रमुखांनी तर प्रतापसिंहांचा अश्व बाहेर जाणे हा प्रकार गैरसमजावरून झालेला आहे.
----------------------------
‘त्या’ अश्वाने रिंगण केलेच नाही
अकलूजमध्ये आज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या गोल रिंगणात ३0 वर्षे धावणारा प्रतापसिंह मोहिते—पाटील यांचा अश्व रिंगण न करताच निघून गेला. पालखी सोहळ््यातील ही घटना चर्चेचा विषय ठरली.
 

Web Title: Arrival in Tukobaraya district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.