राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या आगमनापूर्वी सोलापूर सजले
By Admin | Updated: September 4, 2016 14:02 IST2016-09-04T14:02:45+5:302016-09-04T14:02:45+5:30
सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोलापूरात येत आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या आगमनापूर्वी सोलापूर सजले
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ४ - सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोलापूरात येत आहेत. त्यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून सोलापूर शहर सजवण्यात आले आहे. राष्ट्रपती विमानतळापासून कार्यक्रमस्थळी ज्या मार्गावरुन येणार आहे त्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या ताफ्यात अडथळा येवू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा लाकडी बॅरिकेडींग लावले असून शंभर मिटर अंतरावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सोलापूरातील पार्क मैदान अर्थात इंदिरा गांधी स्टेडिअमवरही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून काही तासात कार्यक्रम सुरु होणार आहे.
दुसरीकडे सुशिलकुमार शिंदे याना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या जनवात्सल्य या सोलापूरच्या निवासस्थानी माजी मंत्री, मित्र, पाहूणे, कार्यकर्ते, नेते यांची गर्दी होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना शिंदे गहिवरुन गेले आहेत तर येणा-या प्रत्येकाचे आमदार प्रणिती शिंदे उत्साहात स्वागत करत आहेत.