दारू पिणाऱ्यांऐवजी विक्रेत्याचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:48+5:302021-09-03T04:22:48+5:30
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील व बुद्धेहाळ तलावाच्या शेजारील २ हजार लोकसंख्येच्या सोमेवाडी गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ...

दारू पिणाऱ्यांऐवजी विक्रेत्याचा बंदोबस्त करा
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील व बुद्धेहाळ तलावाच्या शेजारील २ हजार लोकसंख्येच्या सोमेवाडी गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील तरुणपिढी दारूच्या आहारी गेली आहे. मद्यधुंद अवस्थेतील तळीराम किरकोळ कारणावरून सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घालतात. यामुळे गावात महिलांना रस्त्यावर फिरणेही मुश्कील झाले आहे. दारू पिणाऱ्यांऐवजी गावात चोरून दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा बंदोबस्त करून गावात दारूबंदी करावी, असा ठराव सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला, ग्रामस्थांतून सर्वानुमते करण्यात आला.
यावेळी सरपंच सिंधुताई गोडसे, उपसरपंच तानाजी आलदर, पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्षा सुरेखा खांडेकर, माजी सैनिक आबासाहेब गोडसे, नारायण काळे, ग्रा.पं. सदस्य रंजना खांडेकर, श्यामल येलपले, रेखा गळवे, सुरेश गोडसे, अंकुश डुकरे, बाबुराव गोडसे, विजय गोडसे आदी उपस्थित होते.