शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

क्षेत्र १०० गुंठे...दिवस ९० अन् उत्पन्न मिळाले दोन लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:28 IST

वैरण, मक्याचे दुहेरी उत्पन्न; वाळूज येथील मोटे दाम्पत्याची यशोगाथा

ठळक मुद्देकमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसायऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला

संभाजी मोटे वाळूज : पारंपरिक २० एकरात तीच पिके घेतली जातात. थोडा बदल, प्रयोग म्हणून मक्याचा प्रयोग केला. कमी पाण्यावर आणि कमी श्रमात हे पीक ९० दिवसांत घेणे शक्य झाले आहे़ चक्क शंभर गुंठ्यात दोन लाखांचे पीक निघाले़ ही किमया मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील एका तरुण दाम्पत्याने साधली आहे.

ज्ञानेश्वर मोटे आणि रेश्मा मोटे असे त्या शेतकºयाचे नाव आहे. वडील केशव मोटे आणि जांबुवती मोटे यांनी शेतामध्ये साथ दिली. प्रारंभी त्यांनी नांगरणी करून शेत स्वच्छ करून घेतले़ नंतर सरी सोडून जमीन लागवडीलायक करून घेतली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ड्रोन या वाणाच्या मक्याची लागवड केली़ एका महिन्यानंतर त्यांनी पहिली फवारणी केली. १०० गुंठे क्षेत्रात तीन बाय दीड अंतरावर लागवड केली. त्यानंतर दोन वेळेस खुरपणी केली. मक्याची वाढ पाच फूट झाल्यानंतर लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोराजिन निआॅन अस्त्र आणि फायटर या औषधांच्या पाच फवारण्या केल्या. तसेच वाढीसाठी शेणखत, युरिया, १०.२६.२६ ही खते वापरली़ ९० दिवसांत मका काढणीसाठी आला़ त्यातल्या त्यात दूध देणारी जर्सी गाय, म्हैस असणाºया पशुपालकांना एक गुंठा २ हजार रुपये दराने चाºयासाठी कणसासहित देण्यात आली़ लागवड, खुरपणी, खते फवारणीसाठी एकूण खर्च २० हजार रुपये झाला़ १०० गुंठे क्षेत्रात यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्याच क्षेत्रात इतर पिकेही घेतली- शेतकरी मोटे यांना एकूण दहा एकर शेती आहे. त्यांनी ज्वारी, हरभरा आणि ऊस ही पिके घेतली. ते नेहमी या क्षेत्रावर वैरणीसाठी मक्याची लागवड करतात. गावालगत रोडच्या कडेला शेत आहे. परिसरातील देगाव, मुंगशी, भागाईवाडी, साखरेवाडी येथील पशुपालक वैरणीसाठी हिरवा चारा म्हणून मका घेऊन जातात. मका हे पीक ९० दिवसात काढणीला येते. परिसरात दुभती जनावरे जास्त आहेत़ जनावरांना वैरणीसाठी आणि दूधवाढीसाठी मक्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो़ 

कमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक येते़ ग्रामीण भागात शेतीला पशुपालन हा मुख्य जोडव्यवसाय आहे़ ऊस आणि फळपिकांइतके कष्ट आणि खर्च मक्याला येत नाही़ हे पीक कोणीही घेऊन स्वत:चा शेती व्यवसाय चांगल्यारित्या चालवू शकतो़ लष्करी अळींवर मात करीत घेतले दोन लाखांचे मकापीक घेतले़- ज्ञानेश्वर मोटे, मका उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी