गुन्हे नियंत्रणासाठी ॲप वापरण्याचे वैरागकरांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST2021-09-21T04:25:02+5:302021-09-21T04:25:02+5:30
वैराग : कोणत्याही गावात गुन्हा घडत असल्यास संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा या ॲपचा वापर करून टोल फ्री क्रमांकावर ...

गुन्हे नियंत्रणासाठी ॲप वापरण्याचे वैरागकरांना आवाहन
वैराग : कोणत्याही गावात गुन्हा घडत असल्यास संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा या ॲपचा वापर करून टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा. यामुळे गुन्हेगारीला लगाम बसणार आहे. याचा वापर करावा, असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी केले.
सोमवारी वैराग येथे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहीर, सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पंचायत समीतीचे सभापती अनिल डिसले, निरंजन भूमकर, संतोष निंबाळकर, अरुण सावंत, वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड, समाधान पवार उपस्थित होते.