शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:55 IST

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या ...

ठळक मुद्दे अकलूज येथे टंचाई आढावा बैठकया बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाहीमाळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या फायदा मिळविण्यासाठी चालविल्या जात नाहीत तर मुक्या प्राण्याला चारा, पाणी मिळावे म्हणून चालविल्या जातात, परंतु माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते अशी टीका खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली. 

याबाबत तालुक्यातील सहकारी व सेवाभावी संस्थांची बैठक खा. मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात घेण्यात आली. बैठकीस पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, नायब तहसीलदार तुषार देशमुख, एन. डी. काळे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश रेडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील, गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते, शोभा साठे, विद्या वाघमोडे, हेमलता चांडोले, ताई महाडिक, लतिका कोळेकर, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार, संचालक संग्राम रणवरे, २१ टंचाई गावातील विकास सोसायटीचे चेअरमन, सचिव, ग्रामसेवक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाही. माळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाचे जाचक नियम, आर्थिक असक्षमता यामुळे कोणतीही सहकारी संस्था वा सेवाभावी संस्था चारा छावणी काढण्यास तयार नाही. सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने विनाविलंब चारा डेपो सुरू करावा असेही ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून चारा डेपो सुरु करावा, अशी मागणी केली. माळशिरस तालुक्यातील पिलीव, सुळेवाडी, झंजेवस्ती, पठाणवस्ती, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, पिरळे, भांब, गारवाड, मगरवाडी, कन्हेर, जळभावी, रेडे, गिरवी, कोथळे, गोरडवाडी, फोंडशिरस, शेंडेवाडी, कारुंडे व फडतरी या २१ गावात दुुुुष्काळामुळे सध्या मोठ्या प्रमाणात चारा टंचाई जाणवत आहे. या २१ गावात लहान ७ हजार ४९८ व मोठी २९ हजार ७५६ अशी एकूण ३७ हजार २५४ जनावरांची संख्या आहे. लहान जनावरांना प्रतिदिन सुमारे ७.५ तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो हिरव्या चाºयाची गरज आहे. तालुक्यात आता केवळ चार दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. साखर कारखाने बंद झाल्याने उसाचा चारा मिळेनासा झाला आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी येत्या ४ दिवसात पिलीव, नातेपुते व माणकी येथे चारा छावण्या उघडणे गरजेचे असल्याचे मोहिते-पाटील म्हणाले.

चारा डेपो सुरू करा अन्यथा आंदोलन च्शासनाच्या जाचक अटी व चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेक सहकारी व  सेवाभावी संस्था चारा छावण्या चालविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील हजारो जनावरांवर उपासमारीची वेळ येऊन पडली. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्यापूर्वीच शासनाने या टंचाईग्रस्त २१ गावात येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरु करावा, परंतु चारा, पाण्यावाचून जनावरे उपाशी मरु देऊ नयेत, असे झाले तर तालुक्यातील शेतकरी व जनावरांसह तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता