शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांची कोणतीही तक्रार आता ‘रेल मदत अ‍ॅप’वर...

By appasaheb.patil | Updated: December 19, 2018 14:45 IST

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण त्वरित करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने ‘रेल मदत अ‍ॅप’ सुरू केले करण्यात आल्याची माहिती सोलापूर मंडलाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंन्द्र मल्होत्रा यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली.

ठळक मुद्देप्रत्येक प्रवाशाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची मुभाआपण कोठेही असाल तर आपल्याला समस्येचे निराकरण मिळेलट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनच्या विलंबवर क्लिक करून आपण कोणत्याही प्रकारची मदत व तक्रार घेऊ शकता

सोलापूर : प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण त्वरित करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने ‘रेल मदत अ‍ॅप’ सुरू केले करण्यात आल्याची माहिती सोलापूर मंडलाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंन्द्र मल्होत्रा यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली. या अ‍ॅपबाबत मल्होत्रा यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे :

प्रश्न : रेल मदत अ‍ॅप काय व कसे आहे ? प्रवाशांनी ते कसे वापरले पाहिजे ?उत्तर : या अ‍ॅपद्वारे, रेल्वेने प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. यात प्रथमत: मोबाईल वापरकर्त्याने प्ले स्टोअरमधून अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावयाचे आहे. हे अ‍ॅप उघडताच प्रवाशाने त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर भरल्यानंतर ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर आपले खाते लॉग इन होईल. तक्रार करताना प्रारंभी प्रवाशांनी पीएनआर क्रमांक प्रविष्ट करावा. त्यानंतर स्क्रीनवरील तक्रारीची यादी दिसेल. आपली तक्रार ज्या प्रकारात मोडेल तेथे तक्रार नोंद करावी. पॅसेजर फोटो देखील संलग्न केले जाणार आहे़ आपण कोठेही असाल तर आपल्याला समस्येचे निराकरण मिळेल. फक्त एवढेच नाही की, ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनच्या विलंबवर क्लिक करून आपण कोणत्याही प्रकारची मदत व तक्रार घेऊ शकता.

प्रश्न : या रेल मदत अ‍ॅपचा फायदा काय ?उत्तर : या अ‍ॅपच्या मदतीने देशात कोणत्याही ठिकाणी रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशाला तक्रार करता येणार आहे. यामध्ये प्रवासी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करू शकेल. शिवाय गाडीतील पॅन्ट्रीबद्दल माहिती मिळविणेही या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशाला सहज मदत होणार आहे.

प्रश्न : कशा पध्दतीने होणार प्रवाशांच्या तक्रारीचे निराकारण ?उत्तर : आतापर्यंत प्रवाशांना आॅनलाईन खानपान आणि ट्रेनशी संबंधित माहितीची तक्रार करता येत होती.  एकापेक्षा अधिक आणि रेल्वेच्या इतर विभागाशी संबंधित असल्यास, दुस-या क्रमांकावर ते कॉल करण्यास भाग पाडले जात होते, परंतु ‘रेल मदत’ अ‍ॅपवर फक्त एका क्लिकमध्ये, रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीची नोंदणी करून त्याचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

प्रश्न : आपल्या तक्रारीची सोडवणूक कधी होईल हे प्रवाशाला कसे कळेल ? उत्तर : रेल्वे मंत्रालय प्रवाशांना मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवत आहे. ज्यावरून ते रेल्वे स्टेशनवरील अधिकारी, कामगार व इतर सेवासुविधांबाबत तक्रार करु शकतात. ही तक्रार थेट रेल्वे मंत्रालयात पोहोचेल, त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिका-यांकडेही तक्रारी पोहोचणार आहेत. दरम्यान, काही वेळातच या तक्रारीची दखल घेऊन ही तक्रार सोडविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रत्येक अपडेटची माहिती तक्रारदारास एसएमएसद्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या तक्रारीचे काय झाले याबाबतच्या शंकेचे समाधान होणार आहे.

प्रश्न : अ‍ॅपबाबत प्रवाशांना काय आवाहन कराल ?उत्तर : रेल्वे मदत अ‍ॅपद्वारे प्रवाशांना तक्रार करण्याचे मोठे व्यासपीठ आहे़ या अ‍ॅपचा फायदा घेऊन सोलापूर मंडलातील प्रवाशांनी कसल्याही प्रकारची तक्रार, सूचना  प्रवासाअगोदर किंवा प्रवासादरम्यान असल्यास रेल मदत अ‍ॅपचा उपयोग करून आपली तक्रार नोंदवावी व आपला रेल्वे प्रवास सुखद करावा असेही आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे