शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात आणखी एका स्कॅमचा झटका, २० % परतव्याचे आमिष; २३ लाखाला गंडा

By विलास जळकोटकर | Updated: November 8, 2023 18:32 IST

गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेस्टमेंट या कंपनीत २० टक्के परतव्याचे आमिष दाखवून तसे करारपत्र घेऊन गुंतवणूक करणाऱ्या तिघांना तब्बल २२ लाख ९८ ३१४ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

सोलापूर : अलीकडेच झालेल्या अनेटा स्कॅमचा झटका सोलापूरकर विसरले नाहीत तोच आणखी एक स्कॅम उघडकीस आले आहे. गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेस्टमेंट या कंपनीत २० टक्के परतव्याचे आमिष दाखवून तसे करारपत्र घेऊन गुंतवणूक करणाऱ्या तिघांना तब्बल २२ लाख ९८ ३१४ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या काळात राघवेंद्र भवन दाजी पेठेतील दुकानाच्या गाळ्यात घडला.

याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. या फसवणुकीबद्दल अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय ५६, रा. २५/८ गौरांग बिल्डिंग,पद्मानगर, आरकाल गार्डनजवळ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र रमेश लांडे (वय- ३८) व अमृता बाबूराव रणसुभे (रा. सोलापूर) या दोघांविरुद्ध भादंवि ४०६,४२० ३४ सह महाराष्ट्र ठेवी हितसंबंध अधिनियम क अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.यातील फिर्यादीत कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, दाजी पेठेतील दुकानाच्या गाळ्यामध्ये यातील संशयित आरोपी रवींद्र लांडे व अमृता रणसुभे यांनी गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेंस्टमेंट या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर महिन्याला २० टक्के परतवा देण्याचे आमिष दाखवले. तसे करारपत्र लिहून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानुसार फिर्यादी अनिल कुलकर्णी यांनी १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीच्या मोबदल्यात २० टक्के परतावा देण्याचे कबूल केले. २७ डिसेंबर २०२१ व ३ जानेवारी २०२२ रोजी करारपत्र लिहून दिले. सुरुवातीला वरील आरोपींनी फिर्यादीला ९८ हजार ६०० एवढी रक्कम वेळोवेळी दिली. मात्र, ६ लाख १४ हजार रुपये अद्याप दिले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी दोघांनाही असेच गंडवलेयाच बरोबर फिर्यादी कुलकर्णी यांच्याप्रमाणेच जयेश संगा यांचे ७ लाख ७० हजार रुपये, संतोष पारशेट्टी यांचे ९ लाख १४ हजार ३१४ रुपये आरोपींनी परतवा देण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ७४ हजार ३१४ रुपये गुंतवणूक करून घेतले. मात्र, कबूल केल्याप्रमाणे परतावा न देता असे एकूण २२ लाख ९८ हजार ३१४ रुपये अशी तिघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी