भाजपाला पुन्हा धक्का; अल्पसंख्यांक आघाडीतील पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: August 27, 2023 09:33 IST2023-08-27T09:33:34+5:302023-08-27T09:33:48+5:30
दक्षिण सोलापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी आणि सोलापूर शहर भाजप अल्पसंख्यांक आघाडीतील जवळपास २५ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भाजपाला पुन्हा धक्का; अल्पसंख्यांक आघाडीतील पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर
सोलापूर : भारत राष्ट्र समितीकडून पुन्हा सोलापूर भारतीय जनता पार्टी पक्षाला धक्का बसला आहे. अल्पसंख्यांक आघाडीतील २५ हून अधिक पदाधिकारी रविवारी दुपारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत.
दक्षिण सोलापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी आणि सोलापूर शहर भाजप अल्पसंख्यांक आघाडीतील जवळपास २५ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व पदाधिकारी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून बीआरएस पक्षात प्रवेश करण्यासाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. रविवारी दुपारी सर्व पदाधिकाऱ्यांचा बीआरएस पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश होणार आहे. बीआरएसचे नागेश वल्याळ तसेच सचिन सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी हैदराबादकडे रवाना झाले आहेत.